अहमदाबाद - आज कोलकाता नाईट राइडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामना रंगला होता. या सामन्यात कोलकाता नाईट राइडर्सला विजय मिळाला आहे. नाईट राइडर्सने पंजाब किंग्जला ५ विकेटनी पराभूत केले आहे.
हेही वाचा -कोरोनाच्या भीतीने खेळाडू IPL मधून माघार घेत आहेत, BCCI म्हणते...
केएल राहुल याच्या नेतृत्वात पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ९ बाद १२३ धावा केल्या. नाईट राइडर्स समोर १२४ धावांचे लक्ष होते. त्यांनी हे लक्ष १६.४ ओवरमध्ये ५ विकेट गमवून पूर्ण केले. सलग ४ सामने हारल्यानंतर नाइट राइडर्सला हे यश मिळाले आहे. त्यामुळे, आता आयपीएलच्या गुण सारणीमध्ये नाईट राइडर्स ५ व्या स्थानावर विराजमान झाले आहे, तर पंजाब हे सहाव्या स्थानावर आहे.
सुरुवात नव्हती खास
पंजाब किंग्जकडून मिळालेले लक्ष पूर्ण करण्यासाठी कोलकाता नाईट राइडर मैदानात उतरली, मात्र येथे १७ धावातच नाईट राईडर संघ ३ विकेट गमवून बसले. नीतीश राणा हा शुन्यावर बाद झाला, सुनील नरेन एक रन देखील काढू शकला नाही आणि शुभम गील काही खास कामगिरी करू शकला नाही. तो फक्त नव धावाच काढू शकला. त्यानंतर मात्र, इयन मॉर्गन आणि राहुल त्रिपाठी यांनी संघाला संभाळले आणि अंक तालिकेवर आकडे वाढवले.
संघाचे कप्तान मॉर्गन याने ४० चेंडूत ४७ धावा केल्या, तर त्रिपाठी याने ३२ चेंडूत ४१ धावा केल्या. राहुल याला दीपक हुड्डा याने बाद केले. ८३ धावांवर संघाचे चार गडी पराभूत झाल्यानंतर आंद्रे रसेल मैदानात आला, मात्र तो देखील १० धावांवर बाद झाला. त्याला अर्शदीपने धावबाद केले. त्यानंतर दिनेश कार्तिकने मॉर्गनबरोबर १२ धावा केल्या.
..अशी होती पंजाब किंग्जची सुरुवात
नाणेफेक गमावल्यानंतर पंजाब किंग्जचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मयांक अग्रवाल आणि केएल राहुल या दोघांनी ३६ धावांची सलामी दिली. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर राहुल झेलबाद झाला. त्याने २ चौकार आणि १ षटकारासह १९ धावा केल्या. राहुलचा झेल नरेन याने टिपला. त्यानंतर आलेल्या ख्रिस गेलला भोपळाही फोडता आला नाही. शिवम मावीने त्याला कार्तिकडे झेल देण्यास भाग पाडले.
दीपक हुडा (१) देखील स्वस्तात बाद झाला. त्याला प्रसिद्ध कृष्णाने मॉर्गनकरवी झेलबाद केले. मयांक अग्रवालने दुसरी बाजू लावून धरली होती. पण त्याचा अडथळा नरेन याने दूर केला. मयांकने ३१ धावा केल्या. यात २ षटकार आणि १ चौकाराचा सामावेश आहे. मयांकचा झेल त्रिपाठीने घेतला. मयांकनंतर हेनरिक्स (२) आणि निकोलस पूरन (१९) बाद झाले.
शाहरुख खान प्रसिद्ध कृष्णाला मोठा फटका मारण्याचा नादात झेलबाद झाला. त्याचा झेल मॉर्गनने घेतला. त्याने १३ धावा केल्या. पंजाबने १९व्या षटकात शतक पूर्ण केले. शेवटच्या दोन षटकात ख्रिस जॉर्डनने केलेल्या फटकेबाजीमुळे पंजाबला १२० धावा ओलांडता आल्या. जॉर्डनने १८ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांसह ३० धावा केल्या. कोलकात्याकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर सुनिल नरेन, कमिन्स यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर मावी आणि चक्रवर्थीने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
हेही वाचा -बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघ खेळणार, हे संघ ठरले पात्र