मुंबई - केकेआर विरुद्ध सीएसके सामन्यात ताबडतोड खेळी करणारा आंद्रे रसेल ज्या पद्धतीने बाद झाला, यावर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीरने मत व्यक्त केलं आहे. दरम्यान, उभय संघातील रोमांचक सामना सीएसके १८ धावांनी जिंकला.
गौतम गंभीर म्हणाला, सॅम कुरेनने आंद्रे रसेलला व्यूव्हरचना आखत बाद केलं. त्याने रसेलला ऑफ स्टम्पवर गोलंदाजी करणार, या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावले. रसेलने त्या पद्धतीने फलंदाजी करण्याचा विचार केला असेल. पण कुरेनने रसेलला धक्का देत लेग स्टम्पवर चेंडू फेकला. हा चेंडू रसेलसाठी अनपेक्षित ठरला आणि तो यावर क्लिन बोल्ड झाला.
रसेल ज्या पद्धतीने चेंडूवर प्रहार करत होता. ते पाहून मला वाटत की, तो मनातल्या मनात जाणून होता की, आणखी तीन-चार षटके फलंदाजी केली तर, तो बाद होईपर्यंत ऑफ स्पिनर गोलंदाजीसाठी येणार नाही. विंडीज हा खेळाडू जर आणखी थोडावेळ खेळपट्टीवर थांबला असता, तर केवळ केकेआरला विजय मिळवून दिला नसता तर यासोबत तो शतक देखील ठोकला असता, असे देखील गंभीर म्हणाला.
पुढे गंभीर म्हणाला, 'मला वाटत ड्रेसिंग रुममध्ये परतताना रसेल देखील हाच विचार करत असणार की, त्याने शतक ठोकण्याचा तसेच १६ किंवा १७ व्या षटकात सामना जिंकून देण्याची संधी गमावली.'