मुंबई - दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्याचा कसोटी मालिकेत वेस्ट इंडिज संघाला क्लीन स्विप केलं. दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने विंडीजसमोर विजयासाठी ३२४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजच्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर आफ्रिकेने हा सामना १५८ धावांनी जिंकला. आफ्रिकेच्या माऱ्यासमोर विंडीजचा संघ १७४ धावांच करू शकला.
केशव महाराजने विडिंज विरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिक घेतली. अशी कामगिरी करणारा तो आफ्रिकेचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. महाराजने ३६ धावांत विंडिजचे पाच गडी बाद केले. महाराजने ३७ व्या षटकात किरन पावेल, जेसन होल्डर आणि जोसुआ दा सिल्वा यांना बाद करत हॅट्ट्रिकची किमया साधली. याआधी आफ्रिकेच्या फक्त एका गोलंदाजाला कसोटीत हॅट्ट्रिक घेतली आहे. १९६० मध्ये लॉर्डसवर झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ज्योफ ग्रिफिन याने हॅट्ट्रिक विकेट घेतली होती. त्यानंतर आता तब्बल ६१ वर्षांनंत केशव महाराजने हा विक्रम केला. महाराज हॅट्ट्रिक घेणारा आफ्रिकेचा पहिला फिरकीपटू ठरला.