महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Women IPL Auction : काश्मीरच्या पहिल्या महिला क्रिकेटपटूवर दहा लाखांची बोली! खेळणार या संघाकडून.. - महिला प्रीमियर लीग

काश्मीरची पहिली महिला क्रिकेटपटू आता दिल्लीच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. पहिल्या महिला प्रीमियर लीगसाठी काल झालेल्या लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने काश्मीरच्या जसिया अख्तरला आपल्या संघात सामिल करून घेतले आहे.

Jasia Akhtar
जसिया अख्तर

By

Published : Feb 14, 2023, 7:30 AM IST

शोपियान (जम्मू आणि काश्मीर) : दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील बांदीपोरा येथील महिला खेळाडू जसिया अख्तरची महिला प्रीमियर लीगसाठी निवड झाली आहे. लिलावात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने जसिया अख्तरला दहा लाख रुपयांना विकत घेतले आहे. महिला प्रीमियर लीगसाठी निवड झालेली जसिया ही जम्मू-काश्मीरमधील पहिली महिला क्रिकेटपटू आहे.

पंजाबकडून खेळली आहे : जसिया 2013 पासून पंजाब संघाकडून खेळत आहे. ती पंजाब, ट्रेलब्लेझर्स आणि इंडिया रेड्ससाठी टॉप ऑर्डरची फलंदाज म्हणून खेळली आहे. जसियाला 2017 मध्ये भारतीय संघाच्या राष्ट्रीय शिबिरासाठी बोलावण्यात आले होते, परंतु ती प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकली नाही. दिल्ली कॅपिटल्सने सोमवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विटद्वारे जसिया अख्तरच्या खरेदीची पुष्टी केली. विशेष म्हणजे, 34 वर्षीय जसिया अख्तर, मिताली राज, झुलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर, मिताली राज, दीप्ती शर्मा या स्टार क्रिकेटर्ससोबत खेळली आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली ती पंजाब संघासोबत दोन वर्षे खेळली आहे.

पहिली महिला प्रीमियर लीग : बीसीसीआय द्वारे प्रथमच महिला प्रीमियर लीग (WPL) आयोजित केली जात आहे, ज्याचा पहिला लिलाव काल मुंबईत पार पडला. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात 5 संघ स्पर्धा करत आहेत. यामध्ये मुंबई, अहमदाबाद, लखनौ, दिल्ली आणि बेंगळुरू येथील संघांचा समावेश आहे. टीम इंडियाची स्टार खेळाडू दीप्ती शर्मा, जिची मूळ किंमत 50 लाख रुपये होती, तिला यूपी वॉरियर्सने 2.60 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. टीम इंडियाला अंडर-19 टी-20 विश्वचषक जिंकून देणाऱ्या शेफाली वर्मावर देखील पैशांचा पाऊस पडला आहे. तिला दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांना विकत घेतले आहे

स्मृती मानधना सर्वात महागडी : रताची स्टार खेळाडू स्मृती मानधना हिला लिलावात सर्वाधिक किंमत मिळाली आहे. तिला राॅयल चॅलेंजर्स बॅंगलोरने 3.4 कोटींना खरेदी केले आहे. त्याखालोखाल हरमनप्रीत हिला मुंबई इंडियन्सने 1.8 कोटींना खरेदी केले आहे. महिला आयपीएल 2023 मध्ये आणखी सर्वाधिक किंमत घेणारी विदेशी खेळाडू म्हणजे अ‍ॅशलेह गार्डनर होय. तिला गुजरात जायंट्सने 3.2 कोटींना खरेदी केले आहे. तर एलिस पेरीला राॅयल चॅलेंजर्स बंगलोरने 1.7 कोटींना खरेदी केले आहे. सोफी एक्लेस्टोन हिला यूपी वाॅरियर्सने 1.8 कोटींना खरेदी केले आहे.

हेही वाचा :Women IPL Auction 2023 : भारताची स्मृती मानधना ठरली सर्वात महागडी क्रिकेट खेळाडू; पाहुया इतर स्टार खेळाडूंना किती मिळाली किंमत

ABOUT THE AUTHOR

...view details