मँचेस्टर : इंग्लंड आणि भारतीय संघात वनडे मालिकेतील तिसरा ( IND VS ENG 3rd ODI ) आणि अंतिम सामना रविवारी ओल्ड ट्रॅफर्ड येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम इंग्लंडला 259 धावांवर रोखले. त्यानंतर 42.1 षटकांत 261 धावा करत सामना आणि मालिका दोन्ही जिंकले. त्यानं इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करण्यासाठी वेळ मागितला आहे.
इंग्लंडलने आपल्या 259 धावांचा बचाव करताना इंग्लंडने 16.2 षटकांत भारताची 72/4 अशी अवस्था केली होती. परंतु ऋषभ पंत (नाबाद 125) आणि हार्दिक पांड्या ( All-rounder Hardik Pandya ) (71) यांनी पाचव्या विकेटसाठी 133 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचून भारताला सामन्यात आणि मालिकेत विजय मिळवून दिला. इंग्लंडकडून जोस बटलरने 60 (80) सर्वाधिक धावा केल्या.
सामना संपल्यानंतर बटलर ( Jos buttler Statement ) म्हणाला, "आम्ही अजून सर्वोत्तम फलंदाजी केलेली नाही, आम्हाला अजून चांगले खेळायचे आहे." मी आज एक संधी गमावली, पण मला वाटत नाही की त्याचा कर्णधारपदाशी काही संबंध आहे. मी एक अनुभवी क्रिकेटर आहे ( I am a seasoned cricketer ), पण मी एक तरुण कर्णधार ( but i am a young captain ) आहे. त्यामुळे याबाबत फारशी काळजी करण्याची गरज नाही असे मला वाटते. मला खूप काही शिकायचे आहे आणि त्यासाठी काम करायचे आहे. हे करण्यासाठी मला आणखी थोडा वेळ आणि अनुभव हवा आहे.