नॉटिंगहॅम:आयसीसी कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा फलंदाज जो रूटने ( England batsman Joe Root ) पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सलग दोन सामन्यांत दोन शतके झळकावणारा जो रूट पुन्हा कसोटी क्रिकेटमधील नंबर वन फलंदाज बनला आहे. जो रूटने ऑस्ट्रेलियन दिग्गज मार्नस लॅबुशेनला मागे टाकत पुन्हा नंबर वनची खुर्ची मिळवली ( Joe Root tops the ICC Test rankings ) आहे. जो रुट हा यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकाचा फलंदाज होता आणि तो बराच काळ अव्वल 10 मध्ये राहिला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात जो रूटने शतक झळकावले. या जोरावर तो आधी दुसरा आणि नंतर पहिले स्थान पटकावले आहे. जो रूटच्या खात्यात सध्या 897 रेटिंग पॉईंट्स आहेत, तर मार्नस लाबुशेनच्या खात्यात 892 गुण ( Marnus Labuschen 892 points ) आहेत. तिसर्या क्रमांकावर स्टीव्ह स्मिथ आहे, त्याच्या खात्यात 845 गुण आहेत. बाबर आझम 815 गुणांसह चौथ्या आणि केन विल्यमसन 798 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.