महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ICC Women World Cup 2022 : वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी, झुलन गोस्वामी ठरली पहिली गोलंदाज - वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी महिला

झुलन गोस्वामीने अलिकडेच महिला विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्वविक्रमही केला होता. त्यानंतर आता तिने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम ( Record for most wickets in ODI cricket ) केला आहे.

Jhulan Goswami
Jhulan Goswami

By

Published : Mar 16, 2022, 1:37 PM IST

माउंट मौनगानुई:आयसीसी महिला विश्वचषक ( ICC Women World Cup ) स्पर्धेतील पंधरावा सामना माउंट मौनगानुई येथील बे ओव्हल येथे पार पडला. हा सामना इंग्लंड विरुद्ध भारत संघात खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने भारतावर 4 विकेट्सने विजय मिळवला. परंतु या सामन्यात भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने एक मोठी कामगिरी केली आहे.

भारताची महान वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने बुधवारी एक मोठा विक्रम ( Big record of a Jhulan Goswami ) रचला आहे. आयसीसी महिला विश्वचषक 2022 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात झुलनने तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 250 वी विकेट घेतली. त्याचबरोबर ती जगातील पहिली महिला गोलंदाज ठरली आहे, जिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 250 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने टॅमी ब्यूमॉन्टला पायचित करत ही ऐतिहासिक कामगिरी केली.

झुलन गोस्वामी 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स ( Most wickets in ODI cricket ) घेण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाची कॅथरीन फिट्झपॅट्रिक 180 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच वेस्ट इंडिजची अनिसा मोहम्मद 180 विकेट्ससह संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेची शबनिम इस्माईल आणि इंग्लंडची कॅथरीन ब्रंट 168 आणि 164 गुणांसह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानांवर आहेत.

अलीकडेच झुलन गोस्वामीने महिला विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्वविक्रमही केला ( Jhulan Goswami world record ) होता. तिने ऑस्ट्रेलियाच्या लिन फुलस्टनचा विक्रम मोडीत काठला होता. झुलन 2005 पासून महिला विश्वचषक स्पर्धेत सहभागी होत असून ही तिची पाचवी स्पर्धा आहे. गोस्वामीने 31 सामन्यांत 40 विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा -Women World Cup 2022 : भारताला पुन्हा एकदा खराब फलंदाजीचा फटका; इंग्लंडचा भारतावर 4 विकेट्सने विजय

ABOUT THE AUTHOR

...view details