मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 22 जुलैपासून वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. दुखापतीमुळे गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20I मालिकेतून बाहेर पडल्यानंतर केएल राहुल ( Batsman KL Rahul ) पुनरागमन करण्यासाठी नेटमध्ये घाम गाळत आहे. जर्मनीतील शस्त्रक्रियेनंतर, राहुल बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे सराव करत आहे. 29 जुलैपासून सुरू होणाऱ्या कॅरेबियन दौऱ्यातील T20 सामन्यासाठी तंदुरुस्त होण्यासाठी तो नेटमध्ये कठोर परिश्रम करताना व्हिडिओ व्हायरल झाला ( KL Rahul Video Viral ) आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 30 वर्षीय सलामीवीर भारताच्या महिला क्रिकेट संघाची सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या नेटवर फलंदाजी करत ( Jhulan Goswami bowls to KL Rahul ) आहे. 39 वर्षीय झुलन ही जगातील सर्वात धोकादायक वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे, जिने महिला वनडे आणि टी-20 मध्ये 300 हून अधिक बळी घेतले आहेत. झुलन बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या महिला संघाचा भाग नाही, कारण तिने 2018 मध्ये T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु ती वनडे आणि कसोटी क्रिकेट खेळत आहे.