ऑकलंड:भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने ( Fast bowler Jhulan Goswami ) न्यूझीलंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकात आणखी एक मोठा विक्रम केला आहे. शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळायला उतरताच, झुलन 200 वनडे सामने खेळणारी ( Jhulan Goswami 200th Matches) भारताची दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. या सामन्यापूर्वी केवळ भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने 200 हून अधिक एकदिवसीय सामने खेळले होते. 229 एकदिवसीय सामन्यांसह मिताली राज या यादीत अव्वल स्थानावर आहे.
याआधी झुलनने या विश्वचषकातील शेवटच्या सामन्यात वनडे क्रिकेटमध्ये 250 बळी ( 250 wickets in ODI cricket ) पूर्ण केले होते. हा आकडा गाठणारी ती पहिली महिला गोलंदाज ठरली आहे. इतर कोणतीही महिला गोलंदाज तिच्या विक्रमाच्या जवळपासही नाही. आतापर्यंत जगातील कोणत्याही महिला गोलंदाजाने 200 बळी घेतलेले नाहीत.