नवी दिल्ली : भारताच्या यंगिस्तानने अंतिम सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवत पाचव्यांदा अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकप वर आपले नाव कोरले ( India Win Under 19 World Cup ) आहे. त्यांच्या या दमदार कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारताच्या विश्वविजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करत मोठी घोषणा केली आहे.
जय शाह यांनी ट्विट करत खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षिसांची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, "वर्ल्डकप विजेत्या प्रत्येक खेळाडूला 40 लाख आणि सपोर्ट स्टाफच्या सदस्याला 25 लाखाचे बक्षीस जाहीर करताना मला आनंद आहे. तुम्ही अभिमानास्पद कामगिरी केली आहे," असेही जय शाह यांनी ( Jay Shah Announced 40 Lakh ) म्हटलं.