हैदराबाद :भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ( ENG vs IND 1st ODI ) भारतीय संघाने इंग्लंडचा त्यांच्याच घरच्या मैदानावर वाईटरित्या पराभव केला. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या विजयाचा हिरो ठरला. त्याने सामन्यात 19 धावांत सहा विकेट घेतल्या. त्यानंतर त्याची पत्नी संजना गणेशनचा एक व्हिडिओ तूफान व्हायरल ( Sanjana Ganesan video goes viral ) होत आहे.
सामन्यानंतर जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनने इंग्लंडच्या खेळाडूंना जोरदार ट्रोल ( Sanjana Ganesan trolled England Batters ) केले. संजना ही एक अँकर आहे. अँकरिंग करताना ती म्हणाली, मी फूड एरियात आहे आणि मी जिथे उभा आहे तिथे इंग्लिश फलंदाजांना यायला आवडणार नाही. संजनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहतेही खूप एन्जॉय करत आहेत.
व्हिडिओमध्ये संजना ( Sanjana Ganesan trolled England Cricketers ) म्हणाली, हा फूड एरिया खूप व्यस्त आहे. ते इंग्लिश चाहत्यांनी भरलेले आहे, कारण त्यांना क्रिकेटचे सामना बघायचा नाहीये. तसेच येथे अनेक उत्तम दुकाने आहेत. हॉट डॉग आणि टिपिकल मॅच डे फूड येथे उपलब्ध आहेत. आम्ही इथे एका दुकानाजवळ आलो आहोत, जिथे इंग्लंडच्या बहुतेक फलंदाजांना यायला आवडणार नाही. त्याला 'क्रिस्पी डक' म्हणतात. संजना इथेच थांबली नाही. पुढे तिने इंग्लिश फलंदाजांची चांगलीच मजा घेतली. संजना पुढे म्हणाली, आमच्याकडे 'डक रॅप' (फूड डिश) देखील आहे. हे 'डक' मैदानाबाहेर किती चांगले आहे ते आम्हाला पहायचे आहे, कारण मैदानाच्या आत असलेले 'डक' अप्रतिम आहे.
टीम इंडियाने 18.4 षटकात एकही विकेट न गमावता लक्ष्याचा पाठलाग केला. भारताकडून जसप्रीत बुमराहने 6 आणि मोहम्मद शमीने 3 बळी घेतले. त्याचवेळी फलंदाजीत कर्णधार रोहित शर्माने 76 धावांची नाबाद खेळी ( Rohit Sharma's 76 runs ) केली. ओव्हलवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडला 110 धावांत गुंडाळत 10 विकेट्स राखून विजय मिळवला. यासह त्यांनी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना 14 जुलै रोजी लॉर्ड्सवर होणार आहे.
हेही वाचा -Odi Cricket History : आजच्या दिवशी भारताने खेळला होता पहिला एकदिवसीय सामना, पहा तेव्हाचा निकाल