नवी दिल्ली :आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या पर्वाला 26 मार्च पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 29 मे ला पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी तयारी देखील सुरु केली आहे. परंतु ही स्पर्धा सुरु होण्याअगोदर गुजरात टायटन्स संघाला मोठा धक्का ( Big blow to Gujarat Titans team )बसला आहे.
आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात गुजरात टायटन्स संघाने जेसन रॉय या इंग्लंडच्या खेळाडूवर 2 कोटीची बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले होते. मात्र आता स्पर्धा सुरु होण्या अगोदरच जेसन रॉयने अचानकपणे आयपीएलच्या पंधराव्या हंगामातून माघार घेतली ( Jason Roy withdraws from IPL ) आहे. सूत्राच्या माहितीनुसार रॉय हा जास्त दिवस बायो-बबलमध्ये ( Jason Roy bubble fatigue ) राहण्यास उत्सुक नाही. कारण या अगोदर त्याला पीएसएल स्पर्धेत बराच वेळ बायो-बबलमध्ये राहावे लागले होते. या कारणामुळे त्याने आयपीएलच्या पंधराव्या हंगामातून आपले नाव मागे घेतले आहे.