महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Faulkner Allegations against PSL and PCB : जेम्स फॉकनरची पीएसएल मधून माघार ; पीसीबीवर केले गंभीर आरोप - पीएसएल व्यवस्थापनावर खोटे बोलण्याचा आरोप

क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळणार्‍या फॉकनरने ट्विटरवर असे सांगितले की मी संघ हॉटेल आणि बायो-बबल सोडला आहे. त्यानंतर त्याने पीसीबी आणि पीएसएल व्यवस्थापनावर खोटे बोलण्याचा ( Faulkner allegations against PSL management ) आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.

James Faulkner
James Faulkner

By

Published : Feb 20, 2022, 5:19 PM IST

कराची : सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीगचा थरार रंगत आहे. या स्पर्धेतून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू जेम्स फॉकनरने ( Australian all-rounder James Faulkner ) अचानकपणे माघार घेतली आहे. त्यानंतर जेम्स फॉकनरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर ( James Faulkner accuses Pakistan Cricket Board ) कराराचे पालन न केल्याचा आरोप लावला आहे.

पाकिस्तान सुपर लीग ( Pakistan Super League ) या स्पर्धेत जेम्स फॉकनर हा क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचे प्रतिनिधित्व करत ( James Faulkner member of Quetta Gladiators ) होता. मात्र शनिवारी त्याने या संघाचे बायो-बबल सोडले आहे. त्याने पीसीबी आणि पीएसएल व्यवस्थापनावर खोटे बोलण्याचा आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. पीसीबी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्सने मात्र फॉकनरला त्याच्या करारातील अटींनुसार रक्कम दिली असल्याचे सांगितले. पीसीबीने स्पष्ट केले ( Clarification of PCB about James Faulkner ) की, या ऑस्ट्रेलियन खेळाडूची भविष्यात या टी-20 स्पर्धेत खेळण्यासाठी निवड केली जाणार नाही.

त्यानंतर आता फॉकनरने ट्विट केले आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, "मी पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांची माफी मागतो. पण दुर्दैवाने मला शेवटच्या दोन सामन्यांमधून माघार घ्यावी लागली. पीसीबी माझ्या करार/पेमेंटचा सन्मान करत नसल्याने मी पीएसएल सोडत आहे."

हेही वाचा :Threats To Riddhiman Saha : रिद्धिमान साहाला पत्रकारांनी दिली धमकी ; धमकी देणाऱ्याला सेहवागने फटकारले

ABOUT THE AUTHOR

...view details