कोलंबो - श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू इसुरू उदाना याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 33 वर्षीय क्रिकेटरने आज शनिवारी याची घोषणा केली.
इसुरू उदाना याने या संदर्भात एक पत्रक जाहीर केलं आहे. यात तो म्हणतो, मला वाटत की, नव्या दमाच्या खेळाडूंना रस्ता देण्याची वेळ आली नाही.
श्रीलंकेच्या या अष्टपैलू खेळाडूने आपल्या सर्व चाहत्याचे आभार मानले आहे. याविषयावर तो म्हणाला, श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करणे हे माझ्यासाठी अभिमानाची बाब होती. मी पुढे आपल्या साथीदार खेळाडूंची मदत करत राहीन.
इसुरू उदाना याने श्रीलंकाकडून 21 एकदिवसीय सामने खेळली आहेत. तर 35 टी-20 सामन्यात त्याने श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्याने एकदिवसीयमध्ये 18 तर टी-20 27 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने फलंदाजीत एकदिवसीयमध्ये 237 तर टी-20 256 धावा केल्या आहे.
नुकत्याच पार पडलेल्या भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी इसुरू उदाना श्रीलंका संघाचा सदस्य होता. दोन सामन्यात त्याला संधी देखील मिळाली. परंतु यात त्याला एकही विकेट घेतला आली नाही.
हेही वाचा -Tokyo Olympics : भारतीय थाळीफेकपटू कमलप्रीत कौरचा अंतिम फेरीत झोकात प्रवेश!
हेही वाचा -Tokyo Olympics : पोरींची कमाल! रोमांचक सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने आफ्रिकेला नमवलं