महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आयपीएल लिलाव : ४२ वर्षीय क्रिकेटपटूसाठी कोण लावणार बोली?

अफगाणिस्तानचा १६ वर्षीय नूर अहमद हा यंदाच्या लिलावातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. नयन दोशी आणि नूर अहमद यांची लिलावातील बेस प्राईज प्रत्येकी २० लाख आहे.

आयपीएल लिलाव
आयपीएल लिलाव

By

Published : Feb 14, 2021, 7:30 AM IST

नवी दिल्ली - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. या स्पर्धेसाठीचा लिलाव १८ फेब्रुवारीला चेन्नईत पार पडेल. २९२ खेळाडूंचे नशीब या लिलावातून समोर येणार आहे. या खेळाडूंध्ये ४२ वर्षीय नयन दोशी हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. नयन हा भारताचे दिग्गज माजी डावखुरे फिरकीपटू दिलीप दोशी यांचा मुलगा आहे.

नयन दोशी

हेही वाचा - ऑस्ट्रेलिया ओपन : बार्टी, स्वितोलिना चौथ्या फेरीत, प्लिस्कोवा बाद

तर, अफगाणिस्तानचा १६ वर्षीय नूर अहमद हा यंदाच्या लिलावातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. नयन दोशी आणि नूर अहमद यांची लिलावातील बेस प्राईज प्रत्येकी २० लाख आहे. २००१ ते २०१३ दरम्यान नयनने सौराष्ट्र, राजस्थान रॉयल्स आणि सरेसाठी एकूण ७० सामने खेळले आहेत.

नूर अहमद

नागालँडचा १६ वर्षीय क्रिकेटपटू ख्रिवित्सो केन्से हासुद्ध यंदाच्या लिलावात समावेश केलेला सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे. गेल्या महिन्यात झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने सात गडी बाद केले. केन्सेची बेस प्राईज २० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

या लिलावात १६४ भारतीय, १२५ परदेशी आणि तीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) सदस्य देशांच्या खेळाडूंचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details