अॅडिलेड (ऑस्ट्रेलिया) : इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने ( England captain Jos Buttler ) बुधवारी अॅडलेडमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले की, मला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना पाहायचा ( We will Not Let India Pakistan Reach The Final ) नाही. बटलर ( England Captain Jos Buttler Said ) म्हणाला, "आम्हाला नक्कीच भारत विरुद्ध पाकिस्तान फायनल बघायची नाही आणि आम्ही भारताचा डाव उधळून ( India Pakistan Final Clash Ahead of Their Semi Final Clash ) लावण्याचा प्रयत्न करू." उपांत्य फेरीत खेळण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. साहजिकच, एका महान भारतीय संघाविरुद्धच्या सामन्याबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत.
जाॅस बटलरने सांगितले आम्ही भारताला उपांत्य फेरीत हरवण्याचा प्रयत्न करू :"आम्हाला नक्कीच भारत विरुद्ध पाकिस्तान फायनल होऊ द्यायची नाही. त्याकरिता आम्ही भारताचा डाव नक्कीच उधळून लावण्याचा प्रयत्न करणार आहे. तसे पाहिले तर भारत चांगला संघ आहे," असेही बटलर म्हणाला. स्पर्धेतील आपल्या संघाची कामगिरी आणि उपांत्य फेरीत खेळण्याची तयारी याबद्दल बोलताना बटलरने सांगितले, "आम्हाला जिथे व्हायचे होते तिथे पोहोचलो आहोत. उपांत्य फेरीत खेळण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. साहजिकच, आम्ही भाग्यवान आहोत. एका महान भारतीय संघाविरुद्धच्या सामन्या खेळण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आम्हाला अशा परिस्थितीत राहायला आवडते."
दुखापतीतून आमचे खेळाडू बरे होतील :बटलरने मुख्य इंग्लिश खेळाडू डेव्हिड मलान आणि मार्क वुड यांच्या तंदुरुस्तीबद्दलची बातमीदेखील शेअर केली की, ते अद्याप बरे झालेले नाहीत आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्याबाबत साशंक आहेत. मालनच्या जागेवर फिल सॉल्टची संभाव्य बदली होण्याचे संकेतही त्यांनी दिले. "मालन आणि वुड दोघेही संशयास्पद आहेत. पण, सामन्याच्या दिवशी ते कसे आहेत ते आम्ही पाहू. आमचा आमच्या संघावर विश्वास आहे, ते लवकरच बरे होतील. आमच्या खेळाडूंना तंदुरुस्त राहण्याची गरज आहे. आमच्या संघातील प्रत्येक सदस्यावर पूर्ण विश्वास आहे ते सामना खेळण्यासाठी नक्कीच सज्ज असतील. बर्याच तरुणांसाठी आणि त्यांनी चांगले केले. फिल सॉल्टची मानसिकता विलक्षण आहे. विशेषत: T20 साठी. तो अशी व्यक्ती आहे जो उत्तम कामगिरी करू शकतो," कर्णधाराने सांगितले.
जोस बटलरने भारतीय गोलंदाजांबद्दल केले मत व्यक्त :या स्फोटक फलंदाजाने भारताच्या गोलंदाजीवर आपले मत व्यक्त करताना सांगितले की, भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर हा खूप चांगला गोलंदाज आहे पण त्याला त्याची भीती वाटत नाही. युझवेंद्र चहलबद्दल बोलताना त्याने मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंच्या महत्त्वावर भर दिला आणि त्याला विकेट-टेकिंग पर्याय म्हणून लेबल केले.