नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी बुधवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंच्या संघर्ष, धैर्य आणि दृढनिश्चयावर प्रकाश टाकला. मोदींनी त्यांना अपेक्षा विसरून फक्त बर्मिंगहॅम बहु-क्रीडा स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
व्हर्च्युअल इंटरएक्टिव्ह सत्रादरम्यान पंतप्रधानांनी 3000 मीटर स्टीपलचेसर अविनाश साबळे ( 3000m Steeplechaser Avinash Sable ), वेटलिफ्टर अचिंता शुली, महिला हॉकीपटू सलीमा टेटे, सायकलपटू डेव्हिड बेकहॅम ( Cyclist David Beckham ) आणि पॅरा शॉट पुटर शर्मिला यांच्याशी संवाद ( PM Modi interacts with Indian CWG contingent ) साधला. आपल्या भूतकाळातील कथा जाणून घेत मोदींनी विचारले की खेळाडूंनी त्यांच्या जीवनातील अडथळ्यांवर कशी मात केली. साबळे म्हणाले, "मी 2012 मध्ये भारतीय सैन्यदलात रुजू झालो आणि चार वर्षे जनरल ड्युटी केली. त्यानंतर मी अॅथलेटिक्समध्ये प्रवेश केला. लष्कराचे कठोर प्रशिक्षण आणि सियाचीन ग्लेशियरवरील खडतर पोस्टिंग यामुळे मला स्पर्धांमध्ये खूप मदत झाली."