महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Virat Kohli Gave Flying Kiss To Anushka : राजस्थान रॉयल्सवर आरसीबीचा विजय; चर्चा मात्र विराट अनुष्काच्या फ्लाईंग किसची - आरसीबी

रविवारी बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानात राजस्थान रॉयल्स संघावर आरसीबीने सात धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यात विराट कोहलीने त्याची पत्नी अनुष्का शर्माला दिलेल्या फ्लाईंग किसचीच चर्चा सध्या रंगली आहे.

Virat Kohli Gave Flying Kiss To Anushka
संपादित छायाचित्र

By

Published : Apr 24, 2023, 8:15 AM IST

मुंबई :सध्या आपीएलचा थरार सुरू असून अनेक दिग्गज संघांनी उत्कृष्ठ खेळ केला आहे. रविवारी बंगळुरू येथील मैदानावर आरसीबी आणि राजस्थान रॉयल्सच्या दरम्यान झालेल्या सामन्यात आरसीबीने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. मात्र या सामन्यातील एका व्हिडिओने सोशल माध्यमावर सध्या धुमाकूळ घातला आहे. आरसीबी संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा हा व्हिडिओ असून यात विराटने अनुष्काला मैदानातून फ्लाईंग किस केला आहे. त्यामुळे या व्हिडिओचीच सध्या चर्चा सुरू आहे.

विराट 2019 नंतर प्रथमच कर्णधार म्हणून खेळला सामना :आरसीबी संघाने रविवारी खेळलेला राजस्थान विरुद्धचा हा सामना चांगलाच रंगला. विराट कोहलीने 2019 नंतर पहिल्यांदाच बंगळुरूतील चिन्नास्वामी मैदानावर कर्णधार म्हणून आपल्या संघाचे नेतृत्व केले. त्यामुळेच हा सामना त्याच्यासाठी महत्वाचा होता. हा सामना पाहण्यासाठी त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा मैदानावर उपस्थित होती.

मैदानातच विराटने केला फ्लाईंग किस :विराट कोहलीच्या या सामन्यातील कामगिरीवर त्याची पत्नी अनुष्का शर्मा चांगलीच खूश होती. त्यामुळे अनुष्का शर्मा विराटच्या कामगिरीवर खूश होऊन टाळ्या वाजवत होती. यावेळी मैदानात हर्षल पटेलने स्लो बॉल टाकला होता. तो बॉल कोहलीने सहज पकडला. त्यानंतर लगेचच त्याच्या कामगिरीवर खूश झालेल्या पत्नी अनुष्का शर्माने टाळ्या वाजवल्या. यावर विराटने अनुष्काकडे पाहून फ्लाइंग किस देत जोरात टाळ्या वाजवल्या. विराटने अनुष्काला केलेल्या फ्लाईंग किसनंतर मैदानावरील प्रेक्षकांनी चांगलाच जल्लोष केला.

मैदानात सुरू झाला जल्लोष :विराट कोहलीने त्याची पत्नी अनुष्का शर्माला फ्लाईंग किस दिल्यानंतर बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानात एकच जल्लोष सुरू झाला. मैदानातील प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून विराटच्या नावाचा जयघोष सुरू केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल माध्यमांवरही तुफान व्हायरल होत आहे. या सामन्यात आरसीबीने राजस्थान रॉयल संघावर सात धावांनी विजय मिळवला.

हेही वाचा - Sachin Tendulkar Birthday : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने गाठले वयाचे अर्धशतक, एमसीए देणार मोठे गिफ्ट

ABOUT THE AUTHOR

...view details