अॅडिलेड : भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळला जात असून, या सामन्यात विराट कोहलीने 115 सामन्यांमध्ये 4000 धावा करण्याचा विक्रम ( Virat Made Record of 4000 Runs in 115 Matches ) केला आहे. इंग्लंडविरुद्ध फलंदाजी ( Hitting a Boundary Off Last Ball of 15th Over ) करताना कोहलीने ( Virat kohli Made 4000 Run ) १५व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार मारून हा पराक्रम केला. यासह त्याने आज T20 मध्ये 100 षटकार पूर्ण केले आहेत.
विराट चांगल्या फाॅर्ममध्ये :विराट कोहली या स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विराट कोहलीने इंगलंडविरुद्ध ४३ धावा करताच, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४००० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. अशी कामगिरी करणार विराट कोहली पहिला खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने या सामन्यात ४० चेंडूचा सामना करताना ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५० धावा केल्या.
या यादीत कोहलीनंतर रोहितचे नाव : टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहलीनंतर रोहित शर्मा हा सध्याचा भारतीय कर्णधार आहे. या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी त्याने १४८ सामने खेळले आणि ३१.३६ च्या सरासरीने ३८५३ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल (३५३१), पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (३३२३) आणि त्यानंतर आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग (३१८१) यांचा क्रमांक लागतो.
टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू :