मेलबर्न : ऑस्ट्रेलियात खेळला जाणारा टी-20 विश्वचषक 2022 आता हळूहळू अंतिम ( T20 World Cup 2022 being played in Australia ) टप्प्यात येत आहे. दोन्ही गटांतील उपांत्य फेरीतील संघांचे चित्र आज आणि उद्या स्पष्ट होणार आहे. शेवटच्या सामन्यांमध्ये कोणताही मोठा अपसेट झाला नाही, तर भारत आणि न्यूझीलंडचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित मानला जातो. त्याचवेळी खरी स्पर्धा श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात आहे. जिथे इंग्लंडला उपांत्य फेरीत जाण्यासाठी विजयासोबतच धावगतीही सांभाळावी लागणार आहे. जर भारताचा संघ उपांत्य फेरीत आणि नंतर अंतिम फेरीत पोहोचला, तर स्टार फलंदाज विराट कोहली या T20 विश्वचषक 2022 मध्ये आणखी ( Virat Kohli Can Break Sachin Tendulkar Record ) एक मोठा विक्रम करेल. यावेळी त्याचे लक्ष्य ( Sachin Tendulkar Record of Most Runs in ICC Tournaments सचिन तेंडुलकरच्या विक्रमावर आहे. त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला, तर तो आयसीसीमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरणार ( Virat Kohlis Next Eye will be on Record of Sachin Tendulkar ) आहे.
'विराट' आयसीसी टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरणार टी20 विश्वचषक 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज : तसेच, टीम इंडियाचा शेवटचा गट सामना रविवारी 6 ऑक्टोबर रोजी झिम्बाब्वे संघासोबत होणार आहे. हा सामना जिंकून उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के करून विजयाची मालिका कायम राखण्याची टीम इंडियाला इच्छा आहे. भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत त्याने 4 डावात 220.00 च्या सरासरीने 220 धावा केल्या आहेत आणि 5 डावात त्याने 3 अर्धशतकेही ठोकली आहेत.
'विराट' आयसीसी टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरणार विराटने श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला : यासोबतच त्याने आतापर्यंत खेळलेल्या सर्व T20 विश्वचषक सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा महेला जयवर्धनेचा विक्रमही मोडला आहे. यानंतर आता सचिन तेंडुलकरचा विक्रम त्याच्या निशाण्यावर आहे, तो तोडण्यासाठी फक्त 96 धावांची गरज आहे. जर भारताचा संघ उपांत्य फेरीत आणि नंतर फायनलमध्ये पोहोचला तर स्टार फलंदाज विराट कोहलीचा फॉर्म पाहता या टी-20 विश्वचषक 2022 मध्ये तो आणखी एक मोठा विक्रम करेल असे वाटते.
कोहलीची आता सचिनच्या विक्रमाला गवसणी घालण्याची तयारी : हा विक्रम करण्यासाठी विराट कोहलीची पुढची नजर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डवर असेल, ज्याच्या जवळ विराट कोहली पोहोचतोय. विराट कोहली रविवारी झिम्बाब्वेविरुद्ध खेळेल तेव्हा कोहलीकडून मेलबर्नच्या मैदानावर आणखी एक मोठी खेळी करण्याची अपेक्षा असेल. वास्तविक, ICC T20 विश्वचषक आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी एकत्र करून भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने आयसीसी विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी या दोन्हीमध्ये 2719 धावा केल्या आहेत. मात्र सचिन तेंडुलकरने एकही टी-२० विश्वचषक खेळलेला नाही.
विक्रम मोडण्यासाठी विराटला केवळ 96 धावांची गरज :त्याचवेळी विराट कोहलीने T20 विश्वचषक तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत एकूण 2624 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्यापासून तो फक्त 95 धावा दूर आहे. विराट कोहलीने रविवारी झिम्बाब्वेविरुद्ध 96 धावा केल्या किंवा पुढील 2-3 सामन्यांमध्ये 100 पेक्षा जास्त धावा केल्या तर तो सचिन तेंडुलकरचा विक्रम सहज मोडेल. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याशिवाय उपांत्य आणि अंतिम फेरीपर्यंत खेळल्यास कोहली हे काम सहज करू शकतो. जर त्याने दोन अर्धशतके झळकावली तर संघासह त्याचा विक्रमही होईल, असे बोलले जात आहे. जर भारताचा संघ उपांत्य फेरीत आणि नंतर अंतिम फेरीत पोहोचला, तर स्टार फलंदाज विराट कोहली या T20 विश्वचषक 2022 मध्ये आणखी एक मोठा विक्रम करेल. यावेळी त्याचे लक्ष्य सचिन तेंडुलकरच्या विक्रमावर आहे.