मुंबई - यंदाचा आयपील हंगाम भारतात वाढणाऱ्या कोरोना संक्रमणामुळे स्थगित करण्याचा निर्णय झाला होता. आता हा उर्वरित हंगाम खेळवण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे.
IPL : ऑक्टोबरमध्ये 'यूएई'त खेळवण्यात येणार उर्वरित आयपीएल - इंडियन प्रीमियर लीग २०२१
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात भारतातील पावसाळ्याचा विचार करता संयुक्त अरब अमिराती (यू.ए.ई) मध्ये व्हीओ इंडियन प्रीमियर लीग २०२१ हंगामातील उर्वरित सामने पूर्ण करण्याचे शनिवारी जाहीर केले.
'यूएई'त खेळवण्यात येणार
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विशेष सर्वसाधारण सभेत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. आता उर्वरित आयपीएल ऑक्टोबर महिन्यात खेलवण्यात येणार आहे. याकाळात भारतात पावसाळा असल्यामुळे हे सामने संयुक्त अरब अमिराती (यू.ए.ई) मध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
हेही वाचा - वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ सज्ज; मैदानात भारत उतरणार नव्या जर्सी सह