अॅडलेड : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला आशा ( England All Rounder Ben Stokes Hopes his Bowlers ) आहे की, भारताविरुद्धच्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त्याचे गोलंदाज ( Stokes Hopes his Bowlers will be Control Surya and Virat ) फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीला ( Suryakumar has Really Shined in Cricket World ) रोखण्यात सक्षम असतील. स्टोक्सने पत्रकारांना सांगितले की, सूर्यकुमार खरोखरच क्रिकेट विश्वात चमकला आहे. तो एक हुशार खेळाडू आहे आणि असे काही फटके खेळतो की तुमचे डोके खाजवते.
सूर्यकुमार जबरदस्त फॉर्ममध्ये :तो म्हणाला, तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पण, आम्हाला आशा आहे की, आम्ही त्याच्यावर नियंत्रण ठेवू. त्याला मुक्तपणे खेळू देणार नाही. कोहलीबाबत स्टोक्स म्हणाला की, त्याच्यासारख्या खेळाडूला इतक्या सहजतेने चुकीचा कोणीही ठरवू शकत नाही. तो एकदा मैदानावर नाही खेळला तर त्याला दुर्लक्षित करणे मुर्खपणाचे ठरेल. कोहली आणि स्टोक्स यांच्यातील निरोगी प्रतिस्पर्धी सर्वश्रुत आहे.
विराटला दुर्लक्षित करणे मूर्खपणाचे :स्टोक्स म्हणाला, जर विराट चांगली कामगिरी केल्यानंतर काही महिने चांगला खेळला नाही, तर त्याला दोष देणे हे चुकीचे आहे. किंवा प्रतिस्पर्धी संघाने त्याला दुर्लक्षित करणे चुकीचे आहे. तो एक महान खेळाडू आहे. कारण त्याने तो अधिकार प्राप्त केला आहे. त्याच्या खराब कामगिरीनंतर त्याने पुन्हा जबरदस्त कामगिरी करीत आपला परफाॅर्मन्स दाखवला आहे. मला विश्वास आहे की, त्याच्यासारख्या महान खेळाडूने तो हक्क प्राप्त केला आहे, तो हक्क कधीही परत घेतला जाऊ शकत नाही.