नवी दिल्ली : आपल्या गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने बुधवारी न्यूझीलंडचा सात गडी राखून ( Pakistan Defeated New Zealand by Seven Wickets ) पराभव करीत टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा सामना ( Shoaib Akhtar is Full of Praise For Pakistan Team ) भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी ( Shoaib Akhtar Invited Team India to Melbourne ) होईल. तत्पूर्वी पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएबने ट्विटद्वारे भारताला मेलबर्नवर निमंत्रित केले आहे. भारत-पाकिस्तान लढत होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
न्यूझीलंड संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले :ग्रुप स्टेजमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या न्यूझीलंड संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले 153 धावांचे लक्ष्य पाच चेंडू बाकी असताना तीन गडी गमावून पूर्ण केले. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर संघासाठी स्तुतीसुमने उधळत आहे. शोएब अख्तर एक पाऊल पुढे गेला आहे. पाकिस्तानच्या विजयानंतर त्याने भारताच्या विजयासाठी प्रार्थना केली असून, टीम इंडियाला गुड लक म्हटले आहे.