महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Sunrisers Hyderabad VS Punjab kings : पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा 5 गडी राखून केला पराभव, पण प्लेऑफमध्ये स्थान नाही - सनरायझर्स हैदराबाद पराभव आयपीएल लिग सामना

काल आयपीएल 2022 च्या शेवटच्या लीग सामन्यामध्ये पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळला गेला.

Sunrisers Hyderabad VS Punjab kings
पंजाब किंग विजय आयपीएल लिग सामना

By

Published : May 23, 2022, 7:44 AM IST

मुंबई -काल आयपीएल 2022 च्या शेवटच्या लीग सामन्यामध्ये पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळला गेला. 70 व्या आणि शेवटच्या या लीग मॅचमध्ये आधी फलंदाजीसाठी उतरलेल्या हैदराबाद संघाने पंजाबपुढे 158 धावांचे लक्ष ठेवले. त्यास पंजाबने 5 गडी आणि 29 चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले.

हेही वाचा -Badminton player Saina Nehwal : बॅडमिंटनपटू सायना नेहवाल पोहचली केदारनाथ धामला, बाबा केदारचे घेतले दर्शन

या सामन्यात पंजाबकडून उत्तम गोलंदाजी करणाऱ्या हरप्रित बरारला 'प्लेयर ऑफ द मॅच' म्हणून निवडले गेले. हैदराबाद आणि पंजाब हे दोन्ही संघ १३ सामन्यांत सात पराभवांसह प्लेऑफमधून बाहेर पडले आहेत. या सामन्यात लियाम लिविंगस्टोनने तुफान फलंदाजी केली. त्याने 22 चेंडूंवर 49 धावा केल्या. यात 2 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश आहे. तर हरप्रित बरारने गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. त्यांने 26 चेंडूत हैदराबादचे 3 गडी बाद केले. प्रेरक मांकडने विजयी चौकार लावला आणि पंजाबचा विजय झाला.

पंजाबसाठी शिखर धवनने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली. जॉनी बेयरस्टा 23 धावा करून बाद झाला. पण, धवनने दुसरे टोक सांभाळत 39 धावा केल्या. सामन्यात शाहरूख खान, मयंक अग्रवाल हे काही खास कामगिरी करू शकले नाही. मात्र, लियाम लिविंगस्टोनने जोरदार फलंदाजी केली. त्याने फटाफट 49 धावा केल्या आणि संघाला विजयी मार्गावर नेले.

या सामन्यात हैदराबादने पंजाब पुढे 158 धावांचे लक्ष ठेवले होते. हैदराबाद संघ केन विलियमसन शिवाय मैदानात उतरला होता. आधी फलंदाजी करणाऱ्या या संघाला सुरुवातीलाच झटका बसला. प्रियम गर्ग बाद झाला. यावेळी अभिषेक शर्माने जबाबदारी हातात घेत 32 चेंडूत 43 धावा केल्या. त्यानंतर राहुल त्रिपाठीने 20 रन, एडन मर्करमने 21 रन आणि वाशिंगटन सुंदर, शेफर्ड यांच्या खेळाने संघाला 157 धावांचा स्कोर मिळवून दिला. मात्र, पंजाब संघाने केवळ 15 षटकांत हा स्कोर पूर्ण केला. हा विजय मिळवला जरी असला तरी पंजाबला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. आता लिग मॅच संपल्याने सर्वांचे लक्ष प्लेऑफकडे लागले आहे.

हेही वाचा -German Cup Title : लीपझिगने पहिल्यांदाच पटकावले जर्मन कप स्पर्धेचे विजेतेपद

ABOUT THE AUTHOR

...view details