गुवाहाटी : आयपीएल 2023 चा 8 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात गुवाहाटी येथे खेळला गेला. पंजाबने 20 षटकांत 4 गडी गमावून 197 धावा केल्या. तर राजस्थानने 20 षटकांत 7 गडी गमावून 192 धावा केल्या. आणि राजस्थानचा 5 धावांनी पराभव झाला.
पंजाबचा सलग दुसरा विजय : आजच्या मॅच नंतर पंजाब किंग्जने या मोसमातला सलग दुसरा विजय नोदवला आहे. IPL 2023 चा 8 वा सामना गुवाहाटी येथील बार्सपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्जने 5 धावांनी विजय मिळवला. हे मैदान राजस्थान रॉयल्सचे दुसरे होम ग्राउंड आहे. या सामन्यात कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 4 गडी गमावून 197 धावा केल्या.
शिखरची झंझावती खेळी : 198 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 7 गडी गमावून 192 धावा केल्या. पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने झंझावाती खेळी करताना 56 चेंडूत 86 धावा केल्या. या डावात 153.57 च्या स्ट्राईक रेटने खेळताना धवनने 9 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याच वेळी, 22 वर्षीय युवा फलंदाज प्रभसिमरन सिंगनेही शानदार फलंदाजी करत 34 चेंडूत 176.47 च्या सरासरीने 60 चेंडू जोडले. या खेळीत त्याने 7 आणि 3 षटकारही मारले. याशिवाय जितेश शर्माने 16 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 27 धावा केल्या.
संजू सॅमसनने साभाळला डाव : 198 धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल 8 चेंडूत 11 धावा काढून बाद झाला. त्याला अर्शदीप सिंहने आउट केले. त्यानंतर आलेला अश्विनही काही कमाल दाखवू शकला नाही. तो भोपळा न फोडताच बाद झाला. त्यालाही अर्शदीपने धवनच्या हातून झेलबाद केले. भरवश्याचा फलंदाज जोस बटलरला इलिसने 19 धावांवर बाद केले. कर्णधार संजू सॅमसनने एका टोकाने फलंदाजी करत राजस्थानचा डाव सांभाळला. मात्र त्याला 42 च्या स्कोरवर इलिसनेच बाद केले.
शिखर धवनचे धडाकेबाज अर्धशतक : गुवाहाटीच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना पंजाबने धडाकेबाज सुरुवात केली. शिखर धवनने कर्णधाराच्या रुपात आयपीएलमधील आपले पहिले अर्धशतक ठोकले. पंजाब किंग्सने 20 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 197 धावा केल्या आहेत. शिखर धवन 56 चेंडूत शानदार 86 धावा काढून नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार लगावले. राजस्थानकडून जेसन होल्डरने 29 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट घेतल्या.