नवी दिल्ली : जिओ सिनेमाने इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या चालू हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. या सोबतच जिओ सिनेमाने सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार यादव, महेंद्रसिंह धोनी आणि स्मृती मानधना यांच्या सारख्या लोकप्रिय क्रिकेटपटूंनाही अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. जिओ सिनेमा अॅचा वेगाने प्रसार व्हावा यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. यानंतर आता रोहित शर्मा जिओच्या प्रोमो आणि जाहिरात मोहिमेचा भाग बनून अनेक जाहिरातींमध्ये दिसण्यास सुरुवात होणार आहे.
जिओ चाहत्यांना नवीन अनुभव देणार : जिओ सिनेमाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'स्टार क्रिकेटर आणि भारतीय पुरुष संघाचा कर्णधार रोहित शर्मा जिओ सिनेमाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सामील झाला आहे. आम्ही आमच्या सुविधा वाढवत राहू आणि डिजिटल स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आमच्या लाखो दर्शकांना एक नाविन्यपूर्ण आणि एक नवीन प्रकारचा अनुभव देईल याची खात्री करू'.
प्रोमो आणि अॅड कॅम्पेन चालणार : जिओ सिनेमा लवकरच रोहित शर्मासोबत एक प्रोमो आणि अॅड कॅम्पेन घेऊन येणार आहे. जिओ सिनेमा आणि मुंबई इंडियन्स संघ या दोन्हीची मालकी रिलायन्स ग्रुपकडे आहे. जिओ सिनेमाकडे आयपीएलच्या डिजिटल प्रक्षेपणाचे अधिकार आहेत तर स्टार स्पोर्ट्सकडे टीव्हीचे अधिकार आहेत. दोघेही आयपीएल संदर्भात हाय - ऑक्टेन मार्केटिंग मोहीम चालवत आहेत. हे दोन्ही समूह प्रेक्षक आणि जाहिरातदार दोघांचेही जास्तीत जास्त लक्ष वेधून घेण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत.
लोकांना अॅपकडे आकर्षित करण्याचे उद्दीष्ट : सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार यादव, महेंद्रसिंह धोनी आणि स्मृती मानधना यांसारखी नावांना अॅम्बेसेडर बनवण्याबरोबरच, जिओ सिनेमाने त्यांच्या अॅपवर दररोज मॅच पाहणाऱ्या आणि विविध प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या चाहत्यांना लाखो रुपयांच्या ऑफर आणि बक्षिसे जाहीर केली आहेत. जिओ सिनेमाची लोकप्रियता झपाट्याने वाढवणे आणि अधिकाधिक लोकांना या अॅपकडे आकर्षित करणे हे या मागचे उद्दीष्ट आहे.
हेही वाचा :KL Rahul Fined : लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला 12 लाखांचा दंड