नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या स्पर्धेतील 15 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर एक विकेटने विजय मिळवला. या लीगमध्ये लखनौची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. केएल राहुलच्या संघाने या मोसमात आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत, त्यापैकी 3 जिंकले आहेत. यासह लखनौ पॉइंट टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबीने आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. यासह, आरसीबी पॉइंट टेबलमध्ये 7 व्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या 15व्या सामन्यात सोमवारी झालेल्या पराभवानंतर आरसीबीला आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले.
आरसीबीचा एका विकेटने पराभव :आयपीएल 2023 चा 15 वा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात लखनौने आरसीबीचा एका विकेटने पराभव केला. या सामन्यानंतर आरसीबीला दुहेरी फटका सहन करावा लागला. या सामन्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने लखनौविरुद्ध कमी वेगाने ओव्हर टाकल्याबद्दल आरसीबीला मैदानावर दंड ठोठावला आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला कटऑफ वेळेपूर्वी शेवटचे 20 वे षटक सुरू करण्यात अपयश आले. यामुळे बीसीसीआयने आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसवर 12 लाखांचा दंड ठोठावला आहे.