महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आयपीएलचा 'हा' संघ बांगलादेशमध्ये उघडणार क्रिकेट अकादमी? - राजस्थान रॉयल्स लेटेस्ट न्यूज

एका वृत्तानुसार, बरठाकूर यांनी राजस्थान रॉयल्सच्या काही सदस्यांसह ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर जाऊन तेथील वास्तू पाहिली. बरठाकूर म्हणाले, "आम्हाला बांगलादेशमध्ये राजस्थान रॉयल्सची अकादमी उघडायची आहे. यावर अंतिम निर्णय बाकी आहे.''

Rajasthan Royals academy in Bangladesh
Rajasthan Royals academy in Bangladesh

By

Published : Mar 6, 2021, 9:59 AM IST

ढाका -आयपीएलच्या पहिल्या हंगामाचा विजेता संघ राजस्थान रॉयल्स बांगलादेशमध्ये आपली क्रिकेट अकादमी उघडण्याच्या विचारात आहे. राजस्थान रॉयल्सचे अध्यक्ष रणजित बरठाकूर यांनी ही प्रतिक्रिया दिली. एका वृत्तानुसार, बरठाकूर यांनी राजस्थान रॉयल्सच्या काही सदस्यांसह ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर जाऊन तेथील वास्तू पाहिली.

बरठाकूर म्हणाले, "आम्हाला बांगलादेशमध्ये राजस्थान रॉयल्सची अकादमी उघडायची आहे. यावर अंतिम निर्णय बाकी आहे. परंतु आम्ही त्याबद्दल काळजीपूर्वक विचार करत आहोत. आमच्या स्काउट्सने तळागाळातील क्रिकेटपटू पाठवावेत अशी इच्छा आहे, जेणेकरून ते त्यांच्या कौशल्यांचा लाभ घेऊ शकतील. या अकादमीद्वारे राजस्थान आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) या युवा क्रिकेटपटूंच्या कलागुणांचा आणि कौशल्यांचा वापर करू शकतात.''

ते म्हणाले, "कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्ससारख्या संघांनी गेल्या काही वर्षांत बांगलादेशच्या खेळाडूंवर बोली लावली आहे. आता आम्हीही या खेळाडूंकडे पाहत आहोत. हे खेळाडू कठीण परिस्थितीत खेळतात."

हेही वाचा - स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राचा नवा राष्ट्रीय विक्रम

ABOUT THE AUTHOR

...view details