महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2021 : पंजाब किंग्सने केवळ पाच धावांनी केला सनरायझर्स हैदराबादचा पराभव - IPL 2021

आयपीएल 2021 मध्ये शनिवारी (दि. 25 सप्टेंबर) डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा पाच धावांनी पराभव केला आहे. सुरुवातीला सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. हैदराबादच्या संघाने पंजाबच्या संघाला केवळ 125 धावांत गारद केले. पण, पंजाबाच्या संघानेही शेवटच्या चेंडूपर्यंत लढा देत हैदरबादच्या संघाला 120 धावांत रोखत विजय मिळवला.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Sep 26, 2021, 2:04 AM IST

शारजाह -आयपीएल 2021 मध्ये शनिवारी (दि. 25 सप्टेंबर) डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा पाच धावांनी पराभव केला आहे. सुरुवातीला सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

तेव्हा के एल राहुल आणि मयांक अगरवाल ही जोडी सलामीला मैदानात उतरली. जेसन होल्डरने 5व्या षटकात पंजाबला दोन धक्के दिले. त्याने या षटकातील पहिल्या चेंडूवर के एल राहुलला (21) बाद करत पंजाबला जबर धक्का दिला. यानंतर त्याने अखेरच्या चेंडूवर मयांक अगरवाल (5) याला विल्यमसनकडे देण्यास भाग पाडले.

ख्रिस गेल आणि एडन मार्करम जोडीने पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा राशिद खान हैदराबादसाठी धावून आला. त्याने ख्रिस गेलला (14) पायचित केले. तर निकोलस पूरनची (8) शिकार संदिप शर्माने केली. यानंतर अब्दुल समदने मार्करमला (27) मनिष पांडेकडे झेल देण्यास भाग पाडले. तेव्हा पंजाबची अवस्था 14.4 षटकात 5 बाद 88, अशी झाली.

दीपक हुड्डाची (13) विकेट जेसन होल्डरने घेतली. यानंतर जसप्रीत बराड आणि नॅथन याने संघाला शंभरी पार केले. अखेरीस पंजाबला कशीबशी 20 षटकांत 7 बाद 125 धावांपर्यंत मजल मारता आली. हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, राशिद खान आणि अब्दुल समद यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरासाठी मैदानात उतरलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाची सुरुवात खराब झाली. वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने पहिल्याच षटकात सलामीवीर डेव्हिड वॉर्नर तंबूत पाठवले. त्यानंतर तिसऱ्या षटकांत शामीने हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनचा बळी घेतला. त्यानंतर 13 व्या षटकात फिरकीपटू रवी बिश्नोईने केदार जाधव आणि अब्दुल समद यांना बाद करत सामना आपल्याकडे फिरवण्यास सुरुवात केली. केवळ 60 धावांत हैदराबादने आपले 5 फलंदाज गमावले. यानंतर जेसन होल्डर व वृद्धिमान साहा यांनी 32 धावांची भागीदारी केली. साहा 31 धावा केल्यानंतर धावबाद झाला. होल्डरने एकाकी झुंज लढवत 29 चेंडूत 5 षटकार नाबाद 47 धावा केल्या. पण, त्याची खेळी व्यर्थ ठरली. हैदराबादच्या संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 120 धावांपर्यंत मजल मारली. पंजाबकडून रवी विश्नोईने सर्वाधिक 3 बळी घेतले.

हेही वाचा -DC Vs RR : दिल्लीने उडवला राजस्थानचा धुव्वा; गुणतालिकेत गाठलं अव्वलस्थान

ABOUT THE AUTHOR

...view details