सिडनी :सिडनी येथे न्यूझीलंड आणि पाकिस्तान ( Pakistan Beat New Zealand by 7 Wickets ) यांच्यात टी-20 विश्वचषकाचा ( First Semi Final of T20 World Cup 2022 ) पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ( NZ have Won Toss and Elected to Bat First ) घेतला. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड ( New Zealand Led by Kane Williamson ) आणि बाबर आझमच्या ( Pakistan Led by Babar Azam ) नेतृत्वाखालील पाकिस्तान (PAK vs NZ) यांच्यात आज T20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना झाला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 विकेट गमावून 152 रन ( New Zealand Scored 152 for 4 in 20 Overs ) बनवले, पाकिस्तानसाठी 153 धावांचे ( New Zealand Setting a Target 153 For Pakistan ) लक्ष्य ठेवले होते.
पाकिस्तानी फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत पिचवर धावसंख्येचा पाठलाग :पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी शानदार सुरुवात करीत पाकिस्तानी संघाची धावसंख्या उभारण्यात मोठे योगदान दिले. कर्णधार बाबर आझमला सूर गवसल्यानंतर त्याने जोरदार फटकेबाजी करीत 42 चेंडूत 53 धावा केल्या. तर मोहम्मद रिझवानने 43 चेंडूत 57 धावा केल्या. यांनी पाकिस्तानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
पाकिस्तानचा विजयावर सहज शिक्कामोर्तब :बाबर आणि रिझवान यांनी शानदार शतकी खेळींची भागीदारी करीत पाकिस्तानच्या चिंता कमी केल्या. त्यामुळे पाकिस्तानला हा सहज विजय निश्चित करता आला. ही जोडी आपापल्या अर्धशतकानंतर बोल्टद्वारे यांची विकेट पडली, पण तोपर्यंत न्यूझीलंडच्या हातातून डाव निसटून गेला होता. रिझवान बाद झाल्यानंतर हरिसने जबाबदारी स्वीकारली आणि अखेरीस पाच चेंडू बाकी असताना पाकिस्तानने त्यावर आरामात शिक्कामोर्तब केले. रिझवान 43 चेंडूत 57 धावांवर बाद झाला. बोल्टच्या गोलंदाजीवर फिलिप्सच्या हाती रिझवान झेलबाद झाला.
न्यूझीलंड संघाची कामगिरी :टी20 विश्वचषक 2022 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली असून आज न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) पहिला सेमीफायनल सामना खेळला जात आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघानं प्रथम फलंदाजीचा (New Zealand vs Pakistan) निर्णय घेतला. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांना केवळ 152 धावांपर्यंतच मजल मारता आली आहे. यावेळी कर्णधार केन विल्यमसन आणि डॅरिल मिशेल या दोघांनी एकहाती झुंज दिल्यामुळं धावसंख्या इथवर पोहोचली आहे.
पाकिस्तानी गोलंदाजांची कामगिरी :पाकिस्तान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करीत न्यूझीलंडच्या संघाला 152 पर्यंत रोखण्यात यश मिळवले आहे. एक रनआउट मिस सोडला, तर पाकिस्तानाने मैदानात उत्तम कामगिरी केली. शाहीनने फिन ऍलनची पहिली विकेट घेऊन पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. पाकिस्तानकडून शाहीन अफ्रिदी याने दोन विकेट घेतल्या तर नवाझने एक विकेट घेतली.