महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

2023 IPL : पॉइंट टेबलमध्ये राजस्थान अव्वल, तर गोलंदाजीतही चहल आघाडीवर - धवनकडे ऑरेंज कॅप

इंडियन प्रीमियर लीग 2023 मधील 17 सामन्यांनंतर, पॉइंट टेबलमधील संघांच्या स्थानासह, पर्पल कॅपचे दावेदारही बदलले आहेत. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शेवटच्या चेंडूवर शानदार विजय नोंदवत राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलने मार्क वुडला मागे टाकत पर्पल कॅप मिळवली आहे.

2023 IPL
पॉइंट टेबलमध्ये राजस्थान अव्वल, तर गोलंदाजीतही चहल आघाडीवर

By

Published : Apr 13, 2023, 2:22 PM IST

नवी दिल्ली : चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव तर केलाच पण लखनौ सुपर जायंट्सला हरवून पहिले स्थानही मिळवले. आयपीएलमध्ये आत्तापर्यंत खेळलेल्या 17 सामन्यांमध्ये पाहिले तर राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्सने 4-4 सामने खेळून 6-6 गुण मिळवले आहेत. पण नेटच्या आधारे राजस्थानने पहिले स्थान पटकावले आहे. दोन्ही संघांना 4 सामन्यांत प्रत्येकी एक पराभव पत्करावा लागला आहे.

या संघांची स्थिती पॉइंट टेबलमध्ये सर्वात वाईट : दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्सचा संघ 3-3 सामने खेळून प्रत्येकी दोन जिंकून 4 गुणांसह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, इतर संघांबद्दल बोलायचे झाल्यास, मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांची स्थिती पॉइंट टेबलमध्ये सर्वात वाईट आहे. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्रत्येकी एकच सामना जिंकला आहे, मात्र दिल्ली संघाने आतापर्यंत खेळलेले चारही सामने गमावले असून गुणतालिकेत ते तळाशी आहे.

चहलजवळ पर्पल कॅप :याशिवाय पर्पल कॅपचा दावा करणाऱ्या गोलंदाजांची कामगिरी पाहिली, तर राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहल आघाडीवर आहे. चहल आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यात 10 विकेट घेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. मार्क वुडला मागे टाकत त्याने पर्पल कॅप मिळवली आहे. मार्क वुडने तीन सामन्यांत 9 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर गुजरात टायटन्सचा रशीद खान आहे, ज्याने 3 सामन्यात 8 बळी घेतले आहेत.

धवनकडे ऑरेंज कॅप : याशिवाय फलंदाजांची स्थिती पाहिली तर कळते की पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने या आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून आपल्या संघासाठी केवळ सर्वाधिक धावा केल्या नाहीत तर स्वत:साठीही. आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्येही त्याला आघाडीवर ठेवण्यात आले आहे. त्याने 3 सामन्यात 225 धावा करत ऑरेंज कॅप मिळवली आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आहे, त्याने 4 सामन्यात एकूण 209 धावा केल्या आहेत. आयपीएलच्या या मोसमात २०० हून अधिक धावा करणारा जोश बटलर हा तिसरा फलंदाज आहे. तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. बटलरने चार डावात एकूण 204 धावा केल्या आहेत.

हेही वाचा :Nita Ambani On Piyush Chawla : नीता अंबानी बनल्या पियुष चावलाच्या आक्रमक गोलंदाजीच्या फॅन, त्याला दिला 'हा' विशेष पुरस्कार

ABOUT THE AUTHOR

...view details