जिलॉन्ग : टी 20 वर्ल्ड कपचा आजचा तिसरा ( Namibia Surprised Everyone by Defeating SriLanka ) दिवस. अ गटातील दिवसाचा पहिला ( First Match of Day in Group A ) सामना नेदरलँड आणि नामिबिया यांच्यात खेळला गेला. शेवटपर्यंत रोमांचक झालेल्या आजच्या सामन्यात नेदरलॅंडने नांबियाचा ( T20 World Cup : NAM vs NED ) पाच विकेटने ( Netherlands Beat NAM by 5 Wickets in Thrilling Match ) पराभव केला. नांबियाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नांबियाने निर्धारित 20 षटकांत सहा विकेट गमावून 121 रन बनवले. नेदरलॅंडकरिता 122 धावांचे लक्ष्य होते. नेदरलॅंडने पाच विकेट गमावून 122 धावांचे लक्ष्य साध्य केले.
गुणतालिकेत नांबिया प्रथम स्थानावर :नामिबियाने पहिल्याच सामन्यात श्रीलंकेचा 55 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करून सर्वांनाच चकित केले होते. नेदरलँड्सने रोमहर्षक सामन्यात यूएईचा 3 गडी राखून पराभव केला होता. नांबिया गुण आणि + 2.750 निव्वळ रनरेटसह अ गटात प्रथम क्रमांकावर आहे. त्याच वेळी, नेदरलँड दोन गुण आणि + 0.097 निव्वळ धावगतीसह दुसऱ्या स्थानावर आहे.