अबुधाबी -आयपीएल 2021 आज डबल हेडरमधील दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात अबुधाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला. मुंबईने या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पंजाबने 20 षटकात 6 बाद 135 धावा केल्या. तर मुंबईने पंजाबवर सहा गडी राखून मात केली आहे. हार्दिक पंड्याची शेवटच्या षतकांत केलेली फटकेबाजी आणि सौरभ तिवारीने दिलेली साथ यामुळे पंजाबपासून विजय खेचून आणता आला. पंजाबकडून मार्करम याने यात सर्वाधिक 42 धावांचे योगदान दिले. तर मुंबईकडून बुमराह आणि पोलार्ड यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा के एल राहुल सोबत मनदीस सिंग सलामीला आला. दोघांनी सावध सुरूवात केली. परंतु सहाव्या षटकात कृणाला पांड्याने मनदीप सिंगला पायचित करत पंजाब किंग्सला पहिला धक्का दिला. त्याने 15 धावांची खेळी केली. यानंतर केरॉन पोलार्डने सातव्या षटकात पंजाबला दोन जबर धक्के दिले. त्याने प्रथम ख्रिस गेलला (1) हार्दिक पांड्याकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर त्याने के एल राहुलची शिकार केली. राहुलचा झेल जसप्रीत बुमराहने घेतला. राहुलने 21 धावांचे योगदान दिले.