चेन्नई : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आपल्या गोलंदाजांच्या साधारण प्रदर्शनाने चिंतेत आहे. सीएसकेच्या गोलंदाजांनी आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांत खूप जास्त धावा दिल्या आहेत. यापैकी बहुतेक धावा वाइड आणि नोबॉलमधून आल्या आहेत. सोमवारी चेपॉक स्टेडियमवर 12 धावांनी विजय मिळविल्यानंतर तो म्हणाला की, चेन्नईच्या गोलंदाजांनी सामन्यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त चेंडू टाकले. ही चिंतेची बाब आहे.
लखनऊ विरुद्ध तब्बल 18 अतिरिक्त धावा : चेन्नई सुपर किंग्जच्या वेगवान गोलंदाजांनी सोमवारी रात्री लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध तब्बल 13 वाईड आणि 3 नो - बॉल टाकले. गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांनी एकूण 12 अतिरिक्त धावा दिल्या होत्या. यात 6 लेग बाय, 2 नो बॉल आणि 4 वाईड बॉल होते. तर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात संघाने एकूण 18 अतिरिक्त धावा दिल्या, ज्यात 2 लेग बाय, 3 नो बॉल आणि 13 वाईड बॉलचा समावेश होता.