महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

MS Dhoni in BCCI : भारतीय संघात पुन्हा होऊ शकतो धोनीचा प्रवेश; मोठी जबाबदारी सोपवण्याची शक्यता - भारतीय संघात पुन्हा होऊ शकतो धोनीचा प्रवेश

बीसीसीआयने टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाची कामगिरी( ICC T20 World Cup 2022 ) सुधारण्याच्या योजनेवर काम सुरू केले ( T20 World Cup England Performed Brilliantly and Won Final ) आहे. यासाठी महेंद्रसिंग धोनीच्या हाती मोठी जबाबदारी सोपवली ( BCCI Give Big Responsibility to Dhoni ) जाऊ शकते, अशी माहिती महत्त्वाच्या सूत्रांद्वारे मिळाली आहे.

MS Dhoni May Return in Team India May Get Big Responsibility
भारतीय संघात पुन्हा होऊ शकतो धोनीचा प्रवेश

By

Published : Nov 15, 2022, 5:08 PM IST

नवी दिल्ली : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2022 ( ICC T20 World Cup 2022 ) आता संपला आहे. या विश्वचषकात इंग्लंडने चमकदार कामगिरी करीत दुसऱ्यांदा हे विजेतेपद ( T20 World Cup England Performed Brilliantly and Won Final ) पटकावले. दुसरीकडे, भारतीय संघाची या स्पर्धेची सुरुवात चांगली झाली. मात्र, उपांत्य फेरीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतर आणि मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने अपयशी ठरल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. या तयारीदरम्यान बीसीसीआय भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर मोठी ( BCCI Give Big Responsibility to Dhoni ) जबाबदारी सोपवणार आहे. खरे तर, अहवालांवर विश्वास ठेवला तर धोनी पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो.

महेंद्रसिंग धोनी आयपीएल 2023 च्या खेळातून निवृत्त होऊ शकतो, असा दावा रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर बीसीसीआय त्याला त्याचा अनुभव आणि तंत्राचा योग्य वापर करण्याची मोठी जबाबदारी देऊ शकते.

अहवालानुसार, भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना तिन्ही फॉरमॅट हाताळणे कठीण होत आहे आणि वर्कलोड मॅनेजमेंटसाठी बोर्ड प्रशिक्षकाच्या भूमिकेत फूट पाडू इच्छित आहे, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे बोर्ड 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघाच्या T20 तज्ञ एमएस धोनीला संचालकाची भूमिका देऊ शकते. धोनीला कधी आणि कोणत्या फॉरमॅटमध्ये ही जबाबदारी दिली जाईल याबाबत बीसीसीआयकडून मात्र अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. वृत्तानुसार, या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत धोनीच्या भूमिकेवर चर्चा होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details