चेन्नई -आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) कर्णधार महेंद्रसिंह धोनीने प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. धोनीसोबत संघाचा अनुभवी फलंदाज अंबाटी रायुडू आणि युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यांनीही नेट्समध्ये फलंदाजीला सुरुवात केली. तत्पूर्वी, या खेळाडूंना क्वारंटाइन राहावे लागले आहे. आरटीपीसीआर चाचणीत निगेटिव्ह आल्यानंतर खेळाडूंनी प्रशिक्षणाला सुरुवात केली.
तामिळनाडूचा एन. जगदीसन, आर. साई किशोर आणि सी. हरी निशांत यांनीही धोनी आणि रायुडूबरोबर सराव केला. शिबिरात नवीन गोलंदाज हरिशंकर रेड्डीचाही समावेश झाला आहे. संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ म्हणाले, "सीएसकेच्या खेळाडूंनी क्वारंटाइन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सराव सुरू केला आहे. हळूहळू इतर खेळाडूही संघात सामील होतील."