नवी दिल्ली : आयपीएल 2023 मध्ये खेळल्या जाणार्या सामन्यांमध्ये दररोज नवनवीन विक्रम होत आहेत. तसेच रोज अनेक विक्रम मोडले जात आहेत. पण असे काही खेळाडू आहेत ज्यांचा विक्रम मोडणे हे जवळपास अशक्य आहे. असाच एक विक्रम महेंद्रसिंह धोनीच्या नावावर आहे. हा विक्रम मोडणे आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंसाठी अत्यंत अवघड आहे. यामुळेच धोनीला जगातील सर्वोत्तम फिनिशर म्हटले जाते.
धोनीचे 20 व्या षटकात सर्वाधिक षटकार : 20 षटकांच्या आयपीएल सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या तोडीचे कोणी नाही. आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या इतिहासावर नजर टाकली तर सध्या 20 व्या षटकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. धोनीने या बाबतीत अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. धोनीचा हा विक्रम मोडण्यासाठी उर्वरित खेळाडूंना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.
किरॉन पोलार्ड दुसऱ्या क्रमांकावर : आकडेवारी पाहिली तर, महेंद्रसिंह धोनीने 20 व्या षटकात आत्तापर्यंत एकूण 57 षटकार ठोकले आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर किरॉन पोलार्ड आहे. त्याने 20 व्या षटकात एकूण 33 षटकार ठोकले आहेत. पोलार्ड आता आयपीएलमधून निवृत्त झाला आहे. 20 व्या षटकात षटकार मारण्याच्या बाबतीत चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू रवींद्र जडेजाचे देखील नाव आहे. तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जडेजाने एकूण 26 षटकार मारले आहेत.
महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड
खालच्या क्रमांकावर खेळणारे खेळाडू लिस्टमध्ये : याशिवाय गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने 20 व्या षटकांत एकूण 25 षटकार ठोकले आहेत. तर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माही या लिस्ट मध्ये आहे. त्याने 20 षटकांत एकूण 23 षटकार ठोकले आहेत. अशाप्रकारे पाहिले तर फलंदाजी क्रमवारीत खालच्या क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूंनी 20 व्या षटकात षटकार मारण्याच्या विक्रमात आघाडी घेतली आहे.
हेही वाचा :IPL 2023 : सीएसकेच्या दुखापतग्रस्त खेळाडूंमध्ये धोनीचाही समावेश, माही बाहेर पडल्यास कर्णधार कोण होणार हे जाणून घ्या