हैदराबाद - आयपीएल २०२१ हंगामासाठी आयोजन ठिकाणाच्या यादीत हैदराबादचा देखील समावेश करण्यात यावा, अशी मागणी तेलंगाना राष्ट्र समिती (टीआरएस) चे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामाराव यांनी केली होती. आता भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीननेही या मागणीबाबत जोर धरला आहे. के. टी. रामाराव यांनी एक ट्विट करत बीसीसीआय आणि आयपीएलच्या पदाधिकाऱ्यांना अपील केले होते.
अझरुद्दीन म्हणाला, ''मी केटी रामारावांच्या आवाहनाचे जोरदार समर्थन करतो. बीसीसीआयच्या निर्देशानुसार हैदराबाद आयपीएल आयोजित करण्यात आणि जैव-सुरक्षित वातावरण तयार करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. ''