लखनौ :लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मोहसीन खानने मुंबई इंडियन्सविरुद्धची मॅच-विनिंग कामगिरी केली. हा सामना आपल्या वडिलांना समर्पित करताना मोहसीन म्हणाला की, त्याचे वडील आयसीयूमध्ये असताना, तो वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयपीएलमध्ये खेळत होता. मंगळवारी झालेल्या सामन्याच्या एक दिवस आधी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मोहसीनचे वडील घरी परतले.
मोहसीनने आपल्या संघाला विजय मिळवून दिला :लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला अखेरच्या षटकात 11 धावा करण्यापासून रोखून मोहसीन खानने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. शानदार गोलंदाजी करून सामना जिंकल्यानंतर तो म्हणाला, माझे वडील रुग्णालयात होते, त्यांना कालच आयसीयुमधून डिसचार्ज मिळाला. त्यामुळे मी त्यांच्यासाठी सामना खेळत होतो. ते बहुधा टीव्हीवर खेळ पाहत होते. म्हणूनच मी त्याच्यासाठी खेळत होतो. गेल्या दहा दिवसांपासून ते आयसीयूमध्ये होते.
मोहसीन वर्षभर एकही क्रिकेट सामना खेळला नाही : मोहसीन खानलाही खांद्याला गंभीर दुखापत झाली असून वर्षभर तो एकही क्रिकेट सामना खेळला नाही. मोहसीनने सांगितले की, त्याने आपले शेवटचे 12 महिने मोठ्या कष्टाने काढले आहेत. 2022 मधील त्याच्या पहिल्या आयपीएल हंगामात, 5.97 च्या इकॉनॉमीसह 9 सामन्यांमध्ये 14 विकेट घेतल्यानंतर तो जखमी झाला होता. मोहसीन खान आयपीएल 2023 च्या पहिल्या भागासाठी तंदुरुस्त नव्हता आणि सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये तो खेळू शकला नाही. मोहसीन म्हणाला, "मी एका वर्षानंतर खेळत आहे. मधेच मला दुखापत झाली, माझ्यासाठी तो खूप कठीण काळ होता. गेल्या वर्षी मी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, आज मला वाटले की मी तशीच गोलंदाजी केली आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. आज