मुंबई - ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सने पावर हिटिंगचा शो दाखवला. तो आंद्रे रसेलच्या भूमिकेत होता. अवघ्या 15 चेंडूत त्याने नाबाद 56 धावा फटकावल्या आहेत. एकवेळ डेंजरस आंद्रे रसेलला स्वस्तात आऊट केल्यानंतर मुंबई इंडियन्स सामना जिंकेल असे वाटले होते. पण पॅट कमिन्सने काही चेंडूत खेळच बदलून टाकला. त्याने आयपीएलमध्ये 14 चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. आपल्या वादळी खेळीत त्याने चार चौकार आणि सहा षटकार लगावले आहेत. 13.1 षटकात आंद्र रसेल बाद झाला.
16 व्या ओव्हरमद्ये त्याने 35 धावा केल्या - आंद्र रसेल नंतर पॅट कमिन्स मैदानात आला. त्याने 16 व्या षटकात सामनाच संपवून टाकला. आंद्रे रसेलच्या वादळात मुंबई इंडियन्स उद्धवस्त झाली. खरंतर पॅट कमिन्स हा बॉलर आहे. पण त्याच्या चार षटकात 49 धावा फटकावल्या. पोलार्डने त्याच्या शेवटच्या षटकात 23 धावा केल्या. त्या सगळ्याची भरपाई कमिन्सने बॅटने केली. 16 व्या ओव्हरमद्ये त्याने 35 धावा केल्या.