नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने ( West Indies Veteran All Rounder Kieron Pollard ) आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर ( Pollard Announced on His Social Media Account ) याची घोषणा केली आहे. आता त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित ( Now Pollard has Surprised Everyone by Retiring From IPL ) केले आहे. पोलार्डने निवृत्तीसाठी एक दीर्घ पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले आहे की त्याला आणखी काही वर्षे खेळायचे होते परंतु मुंबईशी बोलल्यानंतर त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
Kieron Pollard Retires From IPL : पोलार्ड याचा आयपीएलमधून संन्यास; मुंबई इंडियन्ससाठी सांभाळणार मोठी जबाबदारी - Pollard Announced on His Social Media Account
आयपीएलमधील सर्वात मोठ्या खेळाडूंपैकी एक असलेल्या किरॉन पोलार्डने ( West Indies Veteran All Rounder Kieron Pollard ) आता आयपीएल स्पर्धेतून सुद्धा निवृत्ती ( Pollard Announced on His Social Media Account ) जाहीर केली आहे. त्याने या अगोदर वनडे मॅचमधून निवृत्ती जाहीर ( Now Pollard has Surprised Everyone by Retiring From IPL ) केली, आता आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करून त्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
किरॉन पोलार्डची मुंबई इंडियन्स सोबतची कामगिरी :किरॉन पोलार्डने मुंबई इंडियन्ससोबत 5 आयपीएल आणि 2 चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकल्या आहेत. किरॉन पोलार्डने लिहिले की मुंबई इंडियन्सने बरेच काही साध्य केले आहे आणि आता ते बदलाच्या टप्प्यातून जात आहेत. हा भावनिक निरोप नाही कारण मी मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षकपद स्वीकारले आहे. तसेच तो मुंबई एमिरेट्ससोबत खेळताना दिसणार आहे.
मागील 1 तप मुंबईसोबत आहे पोलाार्ड : 2010 च्या आयपीएलमध्ये पोलार्डसोबत जोडला गेल्यानंतर तेव्हापासून पोलार्ड मुंबई संघासोबतच आहे. त्याने 171 डावात 3 हजार 412 धावा केल्या. आयपीएलमध्ये पोलार्डची फलंदाजीची सरासरी 28.67 होती, तर त्याच्या कारकिर्दीत स्ट्राईक-रेट 147.32 इतका होता. 16 अर्धशतके झळकावणाऱ्या पोलार्डला लीगमधील सर्वोत्तम फिनिशर मानले जाते. एका दशकाहून अधिक काळ मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सर्वात सातत्यपूर्ण नाव असलेल्या पोलार्डने मागील हंगामात खास कामगिरी केली नाही. त्याने 11 सामन्यांत 14.40 च्या खराब सरासरीने केवळ 144 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेटही केवळ 107.46 होता. ज्यानंतर आता त्याने निवृत्ती जाहीर केली आहे. पोलार्डच्या निवृत्तीनंतर मुंबई इंडियन्सनेही खास फोटो शेअर करत पोलार्डला शुभेच्छा दिल्या आहेत.