नवी दिल्ली - भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरची शनिवारी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या आधी नवीन लखनौ फ्रँचायझीचा मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
दिल्लीचे खासदार गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) नेतृत्व करत त्याच्या नेतृत्वाखाली दोन IPL विजेतेपदे जिंकली आहेत. "डॉ (संजीव) गोयंका आणि RPSG समुहाने मला त्यांच्या संघात ही अद्भुत संधी दिल्याबद्दल धन्यवाद," असे गंभीरने एका निवेदनात म्हटले आहे.
गौतम गंभीरने भारतासाठी ५८ कसोटी, १४७ एकदिवसीय आणि ३७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
तो म्हणाला, "सामने जिंकण्याची जिद्द माझ्यात अजूनही कायम आहे. विजेतेपदाचा वारसा कायम ठेवण्याची इच्छा आजही माझ्यात चोवीस तास कायम आहे. मी ड्रेसिंग रूमसाठी नाही तर उत्तर प्रदेशच्या संघासाठी लढणार आहे." संघाचे नाव अद्याप ठरलेले नाही. या फ्रँचायझीचे मालक संजीव गोयंका यांनी गंभीरचे RPSG कुटुंबात स्वागत केले आहे.
हेही वाचा -दक्षिण अफ्रीका कसोटी दौऱ्यासाठी केएल राहुल उपकर्णधार