नवी दिल्ली -आयपीएलचा 27वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. सायंकाळी साडेसात वाजल्यापासून अरुण जेटली, दिल्ली येथील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आज दोन तगडे संघ समोरासमोर येणार असल्याने क्रिकेट प्रेमींसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.
चेन्नईला लगाम घालण्याचे मुंबईपुढे आव्हान!
गेल्या काही काळापासून मुंबईचा संघ चेन्नईपेक्षा वरचढ आहे. मात्र, यंदा चेन्नई सुसाट असून सध्या ते गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. त्यांनी ६ पैकी ५ सामने खिशात घातले आहेत, तर मुंबईचा संघ ६ पैकी ३ सामन्यांत विजय मिळवून चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे चेन्नईला लगाम घालण्याचे आव्हान मुंबईपुढे असेल.
चेन्नई विजयाचा रथ कायम ठेवणार?
मुंबईची फलंदाजी 2 ते 3 जणांवर अवलंबून आहे. रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक चांगली फलंदाजी करत आहे. पंड्या बंधूंना आतापर्यंत चांगली कामगिरी करता आलेली नाही. तर फलंदाजीची जबाबदारी बुमराह आणि ट्रेन्ट बोल्टच्या खांद्यावर आहे. यामुळे या सामन्यात मुंबई बाजी मारणार की चेन्नई विजयाचा रथ कायम ठेवणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. चेन्नईसाठी मात्र, या मोसमात शानदार कामगिरी करत आहे. चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिस चांगली फलंदाजी करत आहे. सुरेश रैना, अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाही चांगली कामगिरी करत आहे.
मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, क्रुणाल पंड्या, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, ईशान किशन/नॅथन कुल्टर नाईल, जयंत यादव, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ड, पीयूष चावला, धवल कुलकर्णी, सौरभ तिवारी, आदित्य तारे, क्रिस लीन
चेन्नई सुपर किंग्ज
एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), फाफ डु प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, सॅम करन, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, लुंगी एनगिडी, रॉबिन उथप्पा, चेतेश्वर पुजारा, इम्रान ताहीर.