हैदराबाद :आयपीएल 2023 मध्ये आज सनरायझर्स हैदराबादचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होता. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा 7 गडी राखून पराभव केला आहे. हैदराबादचा कर्णधार एडन मार्करमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. लखनऊविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 182 धावा केल्या. प्रत्युतरात लखनऊने 19.2 षटकांत 185-3 धावा करत लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग 11) : अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, टी. नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी ; इम्पॅक्ट प्लेअर्स -विव्रत शर्मा, सनवीर सिंग, मयंक डागर, नितीश कुमार रेड्डी, मार्को जॅनसेन.
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग 11) :क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, क्रुणाल पांड्या (कर्णधार), प्रेरक मांकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक, आवेश खान ; इम्पॅक्ट प्लेअर्स -स्वप्नील सिंग, डॅनियल सॅम्स, आयुष बडोनी, दीपक हुडा, अर्पित गुलेरिया.