बेंगळूरु : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2023 च्या 36 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत करण्यासाठी 201 धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार कोहलीच्या संघाला 20 ओव्हर मध्ये 8 विकेट गमावून केवळ 179 धावा करता आल्या. त्यानुळे 21 धावांनी सामना गमावला.
20 षटकात 200 धावा : एम चिन्नास्वामी स्टेडियमवर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना KKR ने 20 षटकात 5 गडी गमावून 200 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची पहिली विकेट फाफ डू प्लेसिसच्या रूपाने पडली. सुयश शर्माच्या तिसर्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रिंकू सिंगने डु प्लेसिसला बाऊंड्रीवर झेलबाद केले. डु प्लेसिसने 7 चेंडूत 17 धावा केल्या.
शाहबाजच्या ४५ चेंडूत ४० धावा : आरसीबीची दुसरी विकेट शाहबाज अहमदच्या रूपाने पडली. सुयश शर्माच्या 5व्या षटकातील चौथ्या चेंडूवर शभज एलबीडब्ल्यू झाला. शाहबाजने ४५ चेंडूत ४० धावा केल्या. आरसीबीची तिसरी विकेट सहाव्या षटकातील मिथुन चक्रवर्तीच्या पाचव्या चेंडूवर पडली. ग्लेन मॅक्सवेल 4 चेंडूत 5 धावा करून बाद झाला.
कोहलीच्या रूपाने पाचवी विकेट :चौथी विकेट महिपालच्या रूपाने पडली. 12व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आंद्रे रसेलला चक्रवर्ती करवी झेलबाद केले. महिपालने 18 चेंडूत 31 धावा केल्या. आरसीबीची पाचवी विकेट विराट कोहलीच्या रूपाने पडली. आंद्रे रसेलच्या १३व्या षटकातील पहिल्या चेंडूवर व्यंकटेश अय्यरने डीप मिडविकेटवर झेल घेतला.
अशी होती प्लेइंग 11 :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली (कर्णधार), शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, डेव्हिड विली, विजयकुमार विशक, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज कोलकाता नाईट रायडर्स -एन जगदीशन (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, डेव्हिड विसे, वैभव अरोरा, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती
विराट कोहली : आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चिन्नास्वामीवर आम्ही धावांचा चांगला पाठलाग केला आहे. कर्णधारपद मला अनपेक्षित होते, मात्र मला याची सवय आहे. संघ ज्या प्रकारे खेळतो आहे त्यामुळे आतापर्यंत मजा आली आहे. फाफ पुन्हा इम्पॅक्ट प्लेअरची भूमिका साकारणार आहे. आशा आहे की, तो पुढच्या सामन्यात पुन्हा संघाचे नेतृत्व करेल. खेळपट्टी छान आहे. आम्हाला नेहमीच्याच चिन्नास्वामी खेळपट्टीची अपेक्षा आहे.
नितीश राणा : स्पर्धेचा दुसरा हाफ सुरू झाला आहे. ही एक महत्त्वाची मॅच आहे. आम्ही काही चांगले क्रिकेट खेळलो आहे. मात्र काही वेळा अपयशी ठरलो आहे. आता आम्हाला योग्य पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. आम्ही एकत्रितपणे चांगले खेळलो तर निकाल आमच्या बाजूने लागेल. मागील सामन्यात काही सक्तीचे बदल होते. शार्दुलला आणि गुरबाजला स्नायूंचे दुखणे होते. आम्ही फलंदाजीच करणार होतो. शेवटच्या सामन्यातून एक बदल करण्यात आला आहे. कुलवंतच्या जागी वैभव अरोरा संघात आला आहे.
हे ही वाचा :Virat Kohli Fined Once Again : दंडानंतरही कोहली कर्णधारपदावर कायम राहणार, पाहा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नियोज