महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2023 : आरसीबीकडून राजस्थानचा दारूण पराभव, अवघ्या 59 धावांवर संघ ऑलआऊट

आजच्या पहिल्या सामन्यात रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा 112 धावांनी दारूण पराभव केला. राजस्थानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकांत 171-5 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ 10.3 षटकांत 59 धावांवर गारद झाला.

Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore
राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू

By

Published : May 14, 2023, 3:38 PM IST

Updated : May 14, 2023, 6:36 PM IST

जयपूर :आयपीएल 2023 मध्ये आज राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात बंगळुरूने राजस्थानचा 112 धावांनी पराभव केला. बंगळुरूकडून पारनेलने 3 षटकांत 10 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर ब्रेसवेल आणि कर्ण शर्माने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. राजस्थानकडून केवळ हेटमायर आणि रूट दुहेरी धावसंख्या गाठू शकले. हेटमायरने 19 चेंडूत 35 तर रूटने 15 चेंडूत 10 धावा केल्या.

मॅक्सवेल-डू प्लेसिसची अर्धशतके : आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. राजस्थानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकांत 171-5 धावा केल्या. आरसीबीकडून डू प्लेसिसने 44 चेंडूत सर्वाधिक 55 धावा केल्या. तर मॅक्सवेलने 33 चेंडूत 54 धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून झम्पा आणि असिफने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग 11) : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, कर्ण शर्मा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग 11) : यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, अ‍ॅडम झम्पा, संदीप शर्मा, के. एम. आसिफ, युझवेंद्र चहल

फाफ डू प्लेसिस : आम्ही प्रथम फलंदाजी करू. कोरड्या विकेटची परिस्थिती फलंदाजीला अनुकूल असू शकते. इथून पुढे आमचे उद्दीष्ट अगदी स्पष्ट आहे. ही आमच्यासाठी काही वाईट गोष्ट नाही. आम्हाला अधिक चांगले प्रदर्शन करणे आवश्यक आहे. 3 - 4 खेळाडू प्रत्येक मॅचमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. आम्हाला काही चांगल्या परिस्थितीत पोहचण्यासाठी थोडी अधिक मेहनत घेणे आवश्यक आहे. जिंकणे महत्त्वाचे आहे. धावगतीचे दडपण आम्ही सध्या घेत नाही आहोत. आमच्या संघात दोन बदल आहेत. हेझलवूडच्या जागी पारनेल आणि हसरंगाच्या जागी ब्रेसवेल येतो आहे.

संजू सॅमसन : प्रथम फलंदाजीही केली असती. थोडे दडपण आहे. आम्ही याला उपांत्य फेरी मानत आहोत. खरे सांगायचे तर, फक्त गुजरातविरुद्ध आमचा एकतर्फी सामना झाला. बाकीचे सर्व सामन्यात आम्ही स्पर्धात्मक खेळ खेळलो. काही खेळाडूंना दुखापती आहेत. परंतु सहाय्यक कर्मचार्‍यांनी त्यांचे चांगले व्यवस्थापन केले आहे. आमच्या संघात एक बदल आहे. बोल्टच्या जागी झम्पा आला आहे.

हेही वाचा :

  1. IPL 2023 : आज राजस्थान भिडणार आरसीबीशी, घरच्या मैदानावर खेळण्याची चांगली संधी
  2. IPL 2023 : पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 31 धावांनी केला पराभव, हरप्रीत ब्रारने 4 घेतल्या विकेट
  3. IPL 2023 : लखनऊचा हैदराबादवर 7 गडी राखून विजय, मांकडच्या नाबाद 64 धावा
Last Updated : May 14, 2023, 6:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details