धर्मशाला : इंडियन प्रीमियर लीगचा 64 वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. हिमाचल प्रदेशातील धरमशाला क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. पंजाब किंग्जने हा सामना जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. पण दिल्ली कॅपिटलने पंजाबला विजयासाठी 214 धावांचे लक्ष्य दिले. पण पंजाब किंग्जचे फलंदाज खेळू शकले नाहीत. 20 षटकांत 8 गडी गमावून 198 धावा केल्या. आणि दिल्ली कॅपिटल्स 15 धावांनी विजयी झाले. मात्र, दोन्ही संघांना कोणताही फायदा झाला नाही. कारण दोन्ही संघ गुणतालिकेत शेवटच्या पाचमध्ये आहेत.
पहिली विकेट ९१ धावांवर : आजच्या सामन्यातपंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा केली. तर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी केली. डेव्हिड वॉर्नरने 1 आणि पृथ्वी शॉने 3 धावा केल्या. यासह दिल्ली कॅपिटल्सची पहिल्या षटकात बिनबाद 4 धावा झाल्या. दिल्ली कॅपिटल्सची पहिली विकेट ९१ धावांवर पडली. डेव्हिड वॉर्नर 46 धावा करून बाद झाला. त्यावेळी 11 वे षटक टाकले जात होते. कर्णधार डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतक हुकले. त्याने 31 चेंडूत 46 धावा केल्या. त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.
214 धावांचे लक्ष्य: यानंतर शिखर धवनने सॅम कर्नच्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरचा शानदार झेल घेतला. आता पृथ्वी शॉ आणि रिले रुसो ही जोडी क्रीझवर हजर होती. 17व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रिले रुसोने आपले अर्धशतक पूर्ण केले. फिल सॉल्टने 12 चेंडूत 22 आणि रुसोने 33 चेंडूत 65 धावा केल्यानंतर क्रीजवर हजर होता. 19 व्या षटकानंतर दिल्लीची धावसंख्या 2 बाद 190 अशी होती. 20व्या षटकात हरप्रीत ब्रार गोलंदाजी करत होता. दिल्लीची धावसंख्या 2 बाद 213 अशी होती आणि दिल्लीने पंजाबसमोर 214 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
पंजाब किंग्सची कामगिरी: कर्णधार शिखर धवन आणि प्रभासिमरन सिंग यांनी पंजाब किंग्जसाठी सलामी दिली. दिल्ली कॅपिटल्ससाठी खलील अहमदने पहिले षटक टाकले. पंजाब किंग्जची पहिली विकेट शिखर धवनच्या रूपाने पडली. कर्णधार शिखर धवन पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. इशांत शर्माने त्याला अमन हकीम खानकरवी झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले.