मुंबई :आयपीएल 2023 मध्ये आज मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 200-5 धावा केल्या. प्रत्युतरात मुंबईने हे लक्ष 18 षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात गाठले.
कॅमेरून ग्रीनचे शतक :मुंबईकडून कॅमेरून ग्रीनने 47 चेंडूत नाबाद 100 धावा करत टी-20 मधील आपले पहिले शतक ठोकले. आपल्या या खेळीत त्याने 8 चौकार आणि 8 षटकार हाणले. त्याला रोहित शर्माने 56 धावा करत उत्तम साथ दिली. अखेरच्या ओव्हर्समध्ये सूर्यकुमार यादवने येवून जोरदार फटकेबाजी केली व मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार व मयंक डागरने प्रत्येकी 1 बळी घेतला.
हैदराबादच्या ओपनर्सची धडाकेबाज फलंदाजी : हैदराबादकडून सलामीवीर मयंक अग्रवाल आणि विव्रत शर्माने शानदार फलंदाजी केली. मयंकने 46 चेंडूत 8 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने 83 धावा केल्या. विव्रत शर्माने 47 चेंडूत 69 धावा करत त्याला उत्तम साथ दिली. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार व 2 षटकार ठोकले. हैदराबादचे इतर फलंदाज काही मोठी खेळी करू शकले नाही. मुंबईकडून आकाश मधवालने चांगली गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांत 37 धावा देत 4 गडी बाद केले.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग 11) : मयंक अग्रवाल, विव्रत शर्मा, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, नितीश रेड्डी, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक ; इम्पॅक्ट प्लेअर्स -मयंक मार्कंडे, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, अकेल होसेन, अब्दुल समद