मुंबई:इंडियन प्रीमियर लीग आयपीएल 2023 च्या 54 व्या सामन्यात, मुंबई इंडियन्सने वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरशी सामना केला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकांत 6 गडी गमावून 199 धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सला 20 षटकात 200 धावा करायच्या होत्या. प्रत्युत्तरात सूर्यकुमार यादवच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर 16.3 षटकांत 4 गडी गमावून 200 धावा केल्या आणि 6 गडी राखून विजय मिळवला.
आरसीबीची पहिली फलंदाजी : विराट कोहली 4 चेंडूत 1 धावा काढून बाद झाला. डू प्लेसिसने 41 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार लगावत 65 धावा केल्या. अनुज रावतने ४५ चेंडूत ३१ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलने 33 चेंडूत 8 चौकार व 4 षटकारांसह 68 धावा केल्या.महिपाल लोमरोरने 3 चेंडूत 1 धावा व दिनेश कार्तिकने 18 चेंडूत 4 चौकार व 1 षटकारासह 30 धावा केल्या. केदार जाधव 10 चेंडूत 12 धावा (नाबाद) आणि वनिंदुहसारंगा 8 चेंडूत 12 धावा (नाबाद) होते. संघाला 4 धावा अतिरिक्त मिळाल्या. त्यामुळे 20 षटकांत 6 गडी गमावून एकूण 199 धावा झाल्या.
एमआयची गोलंदाजी: जेसन बेरेनडॉर्फने 4 षटकांत 36 धावा देत 3 बळी घेतले. पियुष चावलाने 4 षटकात 41 धावा दिल्या. कॅमेरून ग्रीनने 2 षटकात 15 धावादेत 1 बळी घेतला. ख्रिस जॉर्डनने 4 षटकात 48 धावा देत 1 बळी घेतला. कुमार कार्तिकेने 4 षटकांत 35 धावा देत 1 बळी घेतला आणि आकाश मधवालने 2 षटकांत 23 धावा दिल्या.
बंगळुरुचा संघ : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, विजयकुमार विशक, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड ; इम्पॅक्ट प्लेअर्स -केदार जाधव, मायकेल ब्रेसवेल, सुयश प्रभुदेसाई, कर्ण शर्मा, शाहबाज अहमद.