नवी दिल्ली :143 धावा झाल्यावर मुंबई इंडियन्सला चौथा मोठा धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा 45 चेंडूत 65 धावा करून झेलबाद झाला. मुस्तफिजुर रहमानच्या चेंडूवर यष्टिरक्षक अभिषेक पोरेलने रोहितचा फटका पकडला. मुंबई इंडियन्सला 16व्या षटकात सलग दोन धक्के बसले. दिल्ली कॅपिटल्सचा युवा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने वर्मा 16 षटकातील पाचव्या चेंडूवर झेलबाद केला.
मनीष पांडेने वैयक्तिक ४१ धावा केल्या. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर मुकेशने सूर्यकुमार यादवला बाद करत गोल्डन डकवर झेलबाद केले. 15 षटकांनंतर रोहित शर्मा (61) आणि तिलक वर्मा (25) धावा करत मैदानावर उभे होते. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. हा सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सला त्यावेळी 30 चेंडूत 50 धावांची गरज होती.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहितने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकार ठोकले.10 षटकांनंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या (73/1) होती. 10 षटकांच्या शेवटी, रोहित शर्मा (48) आणि तिलक वर्मा (11) धावा काढल्या. तेव्हा सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सला 60 चेंडूत 82 धावांची गरज होती.
इशान किशन (31) 8व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर 1 धाव चोरून धावबाद झाला. 8 षटकांनंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या (73/1) तर 5 षटकांनंतर धावसंख्या (59/0) होती. मुंबई इंडियन्सच्या दोन्ही सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. 5 षटकांच्या शेवटी, रोहित शर्मा (30) आणि ईशान किशन (28) धावा काढल्या
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ 19.4 षटकांत सर्वबाद 172 धावांवर आटोपला. दिल्ली कॅपिटल्सकडून डेव्हिड वॉर्नर (51) आणि अक्षर पटेल (54) यांनी शानदार अर्धशतके झळकावली. मुंबई इंडियन्सकडून अनुभवी लेगस्पिनर पियुष चावला आणि वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फने ३-३ बळी घेतले. रिले मेरेडिथनेही त्याच्या नावावर 2 विकेट्स घेतल्या. 21:02 एप्रिल 11DC vs MI LIVE: दिल्ली कॅपिटल्सला 19 व्या षटकात 4 धक्के बसले मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फने 19व्या षटकातील पहिल्या चेंडूवर झटका दिला.
प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत सर्वबाद 172 धावा केल्या आहेत. मुंबईला आता विजयासाठी 30 चेंडूत आणखी 50 धावांची आवश्यकता आहे. सध्या रोहित शर्मा (61) आणि तिलक वर्मा (25) क्रिजवर आहेत. इशान किशनच्या रुपाने मुंबईला पहिला झटका बसला. तो 31 च्या स्कोरवर रन आऊट झाला.